Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४२
[§२८
रामदासवचनामृत-दासबोध.

नरदेह पांगुळ असतां । तरी तो कार्यास न येतां ।
अथवा थोटा जरी असतां । तरी परोपकारास न ये ॥ २८ ॥
नरदेह अंध असिला । तरी तो निपटाचि[] वायां गेला ।
अथवा बधिर जरी असिला । तरी निरूपण नाहीं ॥ २९ ॥
नरदेह असिला मुका । तरी घेतां नये आशंका ।
अशक्त रोगी नासका । तरी तो निष्कारण ॥ ३० ॥
नरदेह आसिला मूर्ख । अथवा फेंपऱ्या समंधाचे दुःख ।
तरी तो जाणावा निरर्थक । निश्चयेंसी ॥ ३१ ॥
इतुके हे नस्तां वेंग[] । नरदेह आणी सकळ सांग ।
तेणें धरावा परमार्थमार्ग । लागवेगें ॥ ३२ ॥

दा. १. १०. १-३२.

२९. अंतकालची दुःस्थिति.
परंतु अंतीं नाना दुःखें । तेथें होतें सगट सारिखें ।
पूर्वी भोगिली नाना सुखें । अंती दुःख सोसवेना ॥ २६ ॥
कठिण दुःख सोसवेना । प्राण शरीर सोडीना ।
मृत्य दुःख सगट[] जना । कासाविस करी ॥ २७ ॥
नाना आवेवहीन जालें । तैसोंच पाहिजे वर्तलें ।
प्राणी अंतकाळी गेलें । कासावीस होउनी ॥ २८ ॥
रूप लावण्य अवघे जाते । शरीरसामर्थ्य अवघे राहतें ।
कोणी नस्तां मरतें । आपदआपदों[] ॥ २९ ॥
अंतकाळ दैन्य दीन । सकळिकांस तत्समान ।
ऐसें चंचळ अवलक्षण । दुःखकारी ॥ ३० ॥

  1. सर्वस्वी.
  2. व्यंग
  3. सर्व
  4. दुःखांत.