पान:रामदासवचनामृत.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। २८ ] साक्षात्कार.. सलोकता समीपता । स्वरूपता सायोज्यता। या चत्वार मुक्ती तत्त्वता । इच्छा सेऊन राहिले ॥ १६ ॥ ऐसे सिद्ध साधु संत । स्वहिता प्रवर्तले अनंत ।। ऐसा हा नरदेह विख्यात । काय ह्मणौनि वर्णावा ॥ १७ ॥ या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें। मुख्य सारासारविचारें। बहुत सुटले ॥ १८॥ या नरदेहाचेनि समंधे । बहुत पावले उत्तम पदें । अहंता सांडून स्वानंदें। सुखी जाले ॥ १९॥ नरदेहीं येऊन सकळ । उद्धरागती पावले केवळ । येथे संशयाचें मूळ । खंडोन गेलें ॥ २० ॥ पशुदेहीं नाहीं गती । ऐसें सर्वत्र बोलती। म्हणौन नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ॥ २१ ॥ संत महंत ऋषी मुनी । सिद्ध साधु समाधानी। भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी । विरक्त योगी तपस्वी ॥ २२ ॥ तत्त्वज्ञानी योगाभ्यासी । ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी। षड्दर्शनी तापसी। नरदेहींच जाले ॥ २३ ॥ म्हणौनि नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमध्ये वरिष्ठ । जयाचेनि चुके अरिष्ट । येमयातनेचें ॥ २४ ॥ नरदेह हा स्वाधेन । सहसा नव्हे पराधेन। परंतु हा परोपकारी झिजवून । कीर्तिरूपें उरवावा ॥ २५॥ अश्व वृषभ गाई म्हैसी। नाना पशु स्त्रिया दासी । कृपाळूपणे सोडितां त्यांसी। कोणी तरी धरील ॥२६॥ तैसा नव्हे नरदेहो । इच्छा जाव अथवा राहो। 'परी यास कोणी पाहो । बंधन करूं सकेना ॥२७॥