पान:रामदासवचनामृत.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध... [६ २८ येक माहानुभाव विख्यात । येक भक्त जाले ख्यात ।. येक सिद्ध अकस्मात । गगन वोळगती ॥६॥ येक तेजीं तेजचि जाले । येक जळी मिळोन गेले। येक ते दिसतचि अदृश्य जाले । वायोस्वरूपीं ॥ ७॥ येक येकाचे बहुधा होती । येक देखतचि निघोन जाती। येक बैसले असतांचि भ्रमती । नाना स्थानी समुद्रीं ॥ ८॥ येक भयानकावरी बैसती। येक अचेतने चालविती। येक प्रेतें उठविती । तपोबळे करूनी ॥९॥ येक तेजें मंद करिती । येक जळे आटविती । येक वायो निरोधिती । विश्वजनाचा ॥१०॥ ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी । जयांस वोळल्या नाना सिद्धी। ऐसे सिद्ध लक्षावधी । होऊन गेले ॥११॥ येक मनोसिद्ध येक वाचासिद्ध । येक अल्पसिद्ध येक सर्वसिद्ध। ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध । विख्यात जाले ॥१२॥ येक नवावधाभक्तिराजपंथें । गेले तरले परलोकींच्या । निजस्वार्थे । येक योगी गुप्तपंथें । ब्रह्मभुवना पावले ॥१३॥ येक वैकुंठास गेले । येक सत्यलोकी राहिले। येक कैलासीं बैसले । शिवरूप होउनी ॥ १४ ॥ येक इंद्रलोकीं इंद्र झाले । येक पितृलोकी मिळाले। येक ते उडंगणीं बैसले । येक ते क्षीरसागरीं ॥ १५ ॥ १ आक्रमिती. २ प्राप्त झाल्या. ३ नक्षत्रलोक.