पान:रामदासवचनामृत.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. . २८] साक्षात्कार.... जगदीशापरता लाभ नाहीं। कार्याकारण सर्वकांहीं। संसार करित असतांही । समाधान ॥ ३०॥ मागां होते जनकादिक । राज्य करितांहि अनेक । तैसोच आतां पुण्यश्लोक । कित्येक असती ॥ ३१॥ राजा असतां मृत्य आला । लक्ष कोटी कबुल जाला।। तरी सोडिना तयाला । मृत्य कांहीं ॥ ३२ ॥ ऐसे हैं पराधेन जिणें । यामधे दुखणे बाहाणे। नाना उद्वेग चिंता करणे । किती म्हणोनि ॥ ३३॥ हाट भरला संसाराचा । नफा पाहावा. देवाचा। तरीच या कष्टाचा । परियोये होतो ॥ ३४॥ .. दा. १२. ८. २८-३४. २८. अध्यात्मप्राप्तीविषयी देहाचा उपयोग. धन्य धन्य हा नरदहो । येथील अपूर्वता पाहो। जो जो कीजे परमार्थलाहो। तो तो पावे सिद्धीतें ॥१॥ या नरदेहाचेनि लागधेगें । येक लागले भक्तिसंगें। येकी परम वीतरागें । गिरिकंदरें सीवलीं ॥२॥ येक फिरती तीर्थाटणें । येक करिती पुरश्चरणे। येक अखंड नामस्मरणें । निष्ठावंत राहिले ॥३॥ यक तपें करूं लागले । येक योगाभ्यासी माहाभले। येक अभ्यासयोगें जाले । वेदशास्त्रीं वित्पन्न ॥४॥ येकी हटनिग्रह केला । देह अत्यंत पीडिला। येकी देव ठाई पाडिला । भावार्थबळें ॥५॥ १ बाजार. २ मोबदला. ३ इच्छा. ४ लगबगीनें. -