पान:रामदासवचनामृत.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

TET -IIIRTEEH . .. ३८ रामदासवचनामृत-दासबोध. अहिनिशी ज्या भगवंता । सकल जीवांची लागली चिंता । मेघ वरुषे जयाची सत्ता। सिंधु मर्यादा धरी ॥५६॥ भूमि धरिली धराधरे । प्रगट होईजे दिनकरें॥ ऐसी सृष्टि सत्तामात्रे । चालवी जो कां ॥५७ ॥ ऐसा कृपाळु देवाधिदेव । नेणवे जयाचें लाघव । जो सांभाळी सकळ जीव । कृपाळूपणें ॥५८॥ ऐसा सर्वात्मा श्रीराम। सांडून धरिती विषयकाम । ते प्राणी दुरात्मे अधम । केलें पावती॥ ५९॥ रामेविण जे जे आस । तितुकी जाणावी नैराश । माझें माझें सावकाश । सीणचि उरे ॥६०॥ जयास वाटे सीण व्हावा । तेणें विषयो चिंतीत जावा। विषयो न मिळतां जीवा । तगबग सुटे ॥ ६१ ॥... सांडून राम आनंदघन । ज्याचें मनीं विषयचिंतन । त्यासी कैचें समाधान । लोलंगतांसी ॥६२॥ जयास वाटे सुखचि असावें । तेणें रघुनाथभजनी लागावें। स्वजन सकळही त्यागावे । दुःखमूळ जे ॥६३ ॥ दा. ३. १०. ३९-६३. २७. या संसारयात्रेमध्ये देवाचा नफा पहावा. येथील येथे अवघेचि राहातें । ऐसें प्रत्ययास येते। कोण काय घेऊन जातें । सांगाना कां ॥२८॥ पदार्थी असावें उदास । विवेक पाहावा सावकास। ... येणेकरितां जगदीश । अलभ्य लाभे॥ २९ ॥ १ शेष. २ लोलुप. .