Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
§२६ ]
३७
साक्षात्कार.

कैची माता कैचा पिता । कैची बहिण कैचा भ्राता ।
कैचीं सुहृदें कैची वनिता । पुत्रकळत्रादिक ॥ ४५ ॥
हे तूं जाण मावेची[] । आघवीं सोइरी सुखाची ।
हे तुझ्या सुखदुःखाची । सांगाती नव्हेती ॥ ४६ ॥
कैचा प्रपंच कैचें कुळ । कासया होतोसी व्याकुळ।
धन कण लक्ष्मी सकळ । जाइजणें[] ॥ ४७ ॥
कैचें घर कैचा संसार । कासया करिसी जोजार[]
जन्मवरी वाहोन भार । सेखी[] सांडून जासी ॥ ४८ ॥
कैचें तारुण्य कैचें वैभव । कैचे सोहळे हावभाव ।
हे सकळही जाण माव । माईक माया ॥ ४९ ॥
येच क्षणीं मरोन जासी । तरी रघुनाथीं अंतरलासी ।
माझें माझें म्हणतोसी । म्हणौनियां ॥ ५० ॥
तुवां भोगिल्या पुनरावृत्ती । ऐसी मायबापे किती ।
स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानलक्ष ॥ ५१ ॥
कर्मयोगें सकळ मिळालीं । येके स्थळी जन्मास आलीं ।
ते तुवां आपुली मानिलीं । कैसी रे पढतमूर्खा ॥ ५२ ॥
तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतराचा कोण विचार ।
आतां येक भगवंत साचार । धरी भावार्थबळें ॥ ५३ ॥
येका दुर्भराकारणें । नाना नीचांची सेवा करणे ।
नाना स्तुती आणि स्तवनें । मर्यादा धरावी ॥ ५४ ॥
जो अन्न देतो उदासी । शरीर विकावें लागे त्यासी ।
मा जेणे घातले जन्मासी । त्यासी कैसें विसरावें ॥ ५५ ॥


  1. मायेची.
  2. जाणारे, नश्वर
  3. खटपट, उठाठेव.
  4. शेवटी.