पान:रामदासवचनामृत.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. जेणें राजा वोळविला । तो राव म्हणेना भलत्याला। जेणे देव वोळखिला । तो देवरूपी ॥ २६॥ जयास माईकाची भीड । तें काय बोलेल द्वाड। विचार पाहातां उघड । सकळ कांहीं ॥२७॥ भीड माये ऐलीकडे। परब्रह्म तें पैलीकडे । पैलीकडे ऐलीकडे । सदोदित ॥२८॥ दा. १४. ९. ११-२८. ३. साक्षात्कार. २६. देवाचें भजन कां करावें ? कोण समयो येईल कैसा। याचा न कळे किं भर्वसा। जैसे पक्षी दाही दिशा । उडोन जाती ॥३९॥ तैसें वैभव हे सकळ । कोण जाणे कैसी वेळ। पुत्रकळत्रादि सकळ । विघडोन जाती ॥ ४० ॥ पाहिली घडी नव्हे आपुली । वयसा तरी निघोन गेली। देह पडतांच ठेविली। आहे नीच योनी ॥४१॥ श्वानसूकरादिक नीच याती। भोगणें घडे विपत्ती। तेथें कांहीं उत्तम गती। पाविजेत नाहीं ॥४२॥ मागां गर्भवासी आटांटी। भोगितां जालासी रे हिंपुटी। तेथुनियां थोरा कष्टीं। सुटलासि दैवें ॥४३॥ दुःख भोगिलें आपुल्या जीवें । तेथें कैचि होती सर्वे। तैसेचि पुढे येकलें जावें । लागेल बापा ॥४४॥ यातना.