पान:रामदासवचनामृत.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५] तात्त्विक.. जे होते आणि सवेंचि जातें । तें तें प्रत्ययास येतें। जेथे होणे जाणें नाहीं तें । विवेके ओळखावें ॥१५॥ एक ज्ञान एक अज्ञान । येक जाणावें विपरीत ज्ञान । हे त्रिपुटी होये क्षीण । तेंचि विज्ञान ॥१६॥.... वेदांत सिद्धांत धादांत । याची पहावी प्रचित। निर्विकार सदोदित । जेथें तेथें ॥ १७॥.......... तें ज्ञानदृष्टीने पाहावें । पाहोन अनन्य राहावें। मुख्य आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥१८॥ दृश्यास दिसतें दृश्य । मनास भासतो भास। दृश्यभासातीत अविनाश । परब्रह्म तें ॥१९॥ . पाहों जातां दुरीच्या दुरी । परब्रह्म सबाहे अंतरीं। अंतचि नाहीं अनंत सरी । कोणास द्यावी ॥ २० ॥ चंचळ ते स्थिरावेना । निश्चळ ते कदापि चळेना। आभाळ येतें जातें गगना । चळण नाहीं ॥२१॥ । जे विकारे वाढे मोडे। तेथें शाश्वतता कैची घडे। . कल्पांत होतांच विघडे । सकळ कांहीं ॥२२॥ जें अंतरींच भ्रमलें। मायासंभ्रमें संभ्रमलें। तयास हे कैसें उकलें। आव्हांट चक्र ॥२३॥ भिडेनें वेव्हार निवडेना । भिडेने सिद्धांत कळेना। भिडेनें देव आकळेना। अंतर्यामीं ॥ २४॥ वैद्याची प्रचित येईना। आणि भीडही उल्लंघेना। तरी मग रोगी वांचेना। ऐसें जाणावें ॥ २५॥.. १ स्वप्रत्यय, २ अफाट.