Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
§२४]
३३
तात्त्विक.

महाभूतांचा खंबरि[] केला । आत्मा घालून पुतळा जाला ।
चालिला सृष्टीचा गल्बला । येणे रीती ॥ १८ ॥
आत्मा माया विकार करी । आळ घालिती ब्रह्मावरी ।
प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि भला ॥ १९ ॥
ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड ।
शोधून पाहातां जड । कांहींच नाहीं ॥ २० ॥
गगनासी खंडितां नये । गगनाचे नासेल काय ।
जरी जाला माहांप्रळये । सृष्टीसंव्हार ॥ २१ ॥
जें सव्हारामधे सांपडलें । तें सहजाच नासिवंत जालें ।
जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें ॥ २२ ॥
न कळतां वाटे कोडें । कळतां अवघे दिसे उघडे ।
म्हणोनि येकांती निवाडे । विचार पाहावा ॥ २३ ॥
मिळतां प्रत्ययाचे संत । येकांतापरिस येकांत ।
केली पाहिजे सावचित्त । नाना चर्चा ॥ २४ ॥

दा. २०. ७. १२-२४.


२४. चारही आत्मे मिळून एकच होत.

पाहों जातां आत्मे च्यारी । त्यांचे लक्षण अवधारी ।
हे जाणोनि अभ्यांतरीं । सदृढ धरावें ॥ ४४ ॥
येक जीवात्मा दुसरा शिवात्मा । तिसरा परमात्मा जो विश्वात्मा ।
चौथा जाणिज निर्मळात्मा । ऐसे च्यारी आत्मे ॥ ४५ ॥
भेद उंच नीच भासती । परी च्यारी येकचि असती ।
येविषीं दृष्टांत संमती । सावध ऐका ॥ ४६ ॥


  1. सांगाडा.