पान:रामदासवचनामृत.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

C रामदासवचनामृत दासबोध, [६ २२ पदार्थ वस्तु नासिवंत । हें तो अनुभवास येत । याकारणे भगवंत । पदार्थावेगळा ॥४६॥ देव विमळ आणी चंचळ । शास्त्रे बोलतीं सकळ । तया निश्चळास सकळ । म्हणों नये सर्वथा ॥ ४७ ।। देव आला देव गेला । देव उपजला देव मेला। ऐसें बोलतां दुरिताला । काये उणें ॥४८॥ जन्ममरणाची वार्ता । देवास लागेना सर्वथा। देव अमर ज्याची सत्ता । त्यासी मृत्य कैसेनि ॥४९॥ उपजणे आणी मरणें । येणे जाणे दुःख भोगणें । हे त्या देवाचे करणे। तो कारण वेगळा ॥५०॥ .. दा. ८. १. ८-५. २३. देह, अत्मा आणि ब्रह्म यांचा संबंध, जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्मयांचा। निश्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैंचा। जेथे तेथें ॥ १२ ॥ निश्चळ चंचळ आणि जड । पिंडी करावा निवाड! प्रत्ययावेगळे जाड । बोलणें नाहीं॥१३॥ पिंडामधून आत्मा जातो। तेव्हां निवाडा कळी येतो। देहे जड हा पडतो। देखतदेखतां ॥१४॥ जड तितुकें पडिलें । चंचळ तितुकें निधोनि गेलें। जड चंचळाचे रूप आलें । प्रत्ययासी॥ १५ ॥ निश्चळ आहे सकळां ठाई । हें तो पाहाणे नलगे कांहीं। गुणविकार तेथें नाहीं। निश्चळासी॥१६॥. जैसे पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड। जड चंचळ जातां जाड । परब्रह्मचि आहे ॥ १७ ॥ . - .