पान:रामदासवचनामृत.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - 5२२] तात्त्विक. अवधी सृष्टि जो कर्ता । तो ते सृष्टिहूनि पर्ता। तेथे संशयाची वार्ता । कार्टूचि नये ॥ ३४ ॥ खांबसूत्रींची बाहुली । जेणे पुरुषे नाचविली। ताचि बाहुली हे बोली। घडे केवीं ॥ ३५ ॥ छायामंडपींची सेना । सृष्टिसारिखीच रचना। सूत्रे चाळी परी तो नाना । वेक्ति नव्हे ॥ ३६॥ तैसा सृष्टिकर्ता देव । परी तो नव्हे सृष्टिभाव। जेणे केले नाना जीव । तो जीव कैसेनी ॥ ३७॥ जें जें जया करणे पडे । तें तें तो हैं कैसें घडे। म्हणोनि वायांचि बापुडे । संदेहीं पडती ॥ ३८ ॥ सृष्टि ऐसेंचि स्वभावें । गोपुर निर्मिलें बरवें । परी तो गोपुरकर्ता नव्हे । निश्चयेंसि ॥ ३९ ॥ तैसें जग निर्मिले जेणें । तो वेगळा पूर्णपणे॥ एक म्हणती मूर्खपणें । जग तोचि जगदीश ॥४०॥ एवं जगदीश तो वेगळा । जग निर्माण त्याची कळा । तो सर्वांमध्ये परी निराळा । असोन सर्वी ॥४१॥ म्हणोनि भूतांचा कर्दमु । यासि अलिप्त आत्मारामु । अविद्यागुणें मायाभ्रमु । सत्यचि वाटे ॥४२॥ मायोपाधी जगडंबर । आहे सर्वही साचार।। ऐसा हा विपरीत विचार। कोठेंचि नाहीं॥४३॥ म्हणोनि जग मिथ्या साच आत्मा । सर्वोपर जो परमात्मा। अंतर्बाह्य अंतरात्मा । व्यापूनि असे ॥ ४४ ॥ तयास म्हणावें देव । येर हे अवघेचि वाव । ऐसा आहे अंतर्भाव । वेदांतींचा ॥४५॥