पान:रामदासवचनामृत.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - - T रामदासवचनामृत-दासबोध. ठाई ठाई देव असती । तेहिं केली नाही क्षिती। चंद्रसूर्य तारा जीमूती' । तयांचेनि नव्हे ॥ २३॥ सर्वकर्ता तोचि देव । पाहों जातां निरावेव। ज्याची कळा लीळा लाघव । नेणती ब्रह्मादिक ॥२४॥ येथें आशंका उठिली । ते पुढिलिये समासी फिटली । आतां वृत्ति सावध केली पाहिजे श्रोतीं ॥२५॥ पैस अवकाश आकाश । कांहींच नाहीं में भकास। तये निर्मळी वायोस। जन्म झाला ॥ २६॥ वायोपासून जाला वन्ही । वन्हीपासुनी जालें पाणी। ऐसी जयाची करणी। अघटित घडली ॥२७॥ उदकापासून सृष्टि जाली । स्तंभेविण उभारली। ऐसी विचित्र कळा केली । त्या नांव देव ॥२८॥ देवें निर्मिली हे क्षिती। तिचे पोटीं पाषाण होती। तयासचि देव म्हणती। विवेकहीन ॥२९॥ जो सृष्टिनिर्माणकर्ता । तो ये सृष्टिपूर्वी होता। मग हे तयाची सत्ता । निर्माण झाली ॥ ३०॥ कुल्लाळ पात्रापूर्वी आहे। पात्रे कांहीं कुल्लाळ नव्हे । तैसा देव पूर्वीच आहे। पाषाण नव्हे सर्वथा ॥३१॥ मृत्तिकेचे शैन्य केलें। कर्ते वेगळे राहिले। कार्यकारण येक केलें । तरी होणार नाहीं ॥३२॥ तथापी होईल पंचभूतिक । निर्गुण नव्हे काहीं येक। कार्याकारणाचा विवेक । भुतांपरता नाहीं ॥३३॥ - १ ढग, २ शून्य. ३ कुंभार.