पान:रामदासवचनामृत.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. २२] - - तात्त्विक. TA बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतांमतांस विरोध। ऐसा करितां वेवाद । बहुत गेले ॥१२॥ सहस्रामधे कोणी येक । पाहे देवाचा विवेक। परी त्या देवाचे कौतुक । ठाई न पडे ॥१३॥ ठाई न पडे कैसें म्हणतां । तेथे लागली अहंता। देव राहिला परता। अहंतागुणें ॥१४॥ आतां असो हे बोलणें । नाना योग ज्या कारणे। तो देव कोण्या गुणें । ठाई पडे ॥१५॥ देव कोणासी म्हणावें । कैसें तयासी जाणावें । तेंचि बोलणे स्वभावें । बोलिजेल ॥१६॥ जेणे केलें चराचर । केले सृष्टयादि व्यापार। सर्वकर्ता निरंतर । नाम ज्याचें ॥१७॥ तेणे केल्या मेघमाळा । चंद्रबिंबी अमृतकला। तेज दिधलें रविमंडळा । जया देवें ॥१८॥ जयाची मर्यादा सागरा । जेणें स्थापिले फणिवरा। जयाचेनि गुणें तारा । अंतरिक्ष ॥१९॥ च्यारी खाणी च्यारी वाणी। चोयांशी लक्ष जीवयोनी। जेणें निर्मिले लोक तिनी । तया नांव देव ॥२०॥ ब्रह्मा विष्णु आणि हर । हे जयाचे अवतार। तोचि हा देव निर्धार । निश्चयेसीं ॥ २१॥ देव्हारांचा उठोनि देव । करूं नेणे सर्व जीव । तयाचेनि ब्रह्मकटाव । निर्मिला न वचे ॥२२॥ १ ब्रह्मांडव्यूह.