पान:रामदासवचनामृत.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२१) तात्त्विका नाना लोक नाना स्थानें । चंद्र सूर्य तारांगणें । . सप्त द्वीपें चौदा भुवनें । ऐलिकडे ॥५॥ शेष फर्म सप्त पाताळ । येकविस स्वर्गे अष्टदिक्पाळ । तेतिस कोटी देव सकळ । ऐलिकडे ॥५१॥ बारा आदित्य अकरा रुद्र । नवनाग सप्त ऋषेश्वर । नाना देवांचे अवतार । ऐलिकडे ॥५२॥ मेघ मनु चक्रवती । नाना जीवांची उत्पत्ति। ... आतां असो सांगों किती । विस्तार हा ॥ ५३॥ सकळ विस्ताराचे मूळ । तें मूळमायाच केवळ। मागां निरोपिली सकळ । पंचभूतिक ॥ ५४॥ सूक्ष्म भूतें जे बोलिली । तेचि पुढे जडत्वा आलीं। ते सकळही बोलिलीं। पुढिले समासीं ॥ ५५ ॥ पंचभूते पृथकाकारें । पुढें निरोपिली विस्तारें। वोळखीकारणे अत्यादरें। श्रोतीं श्रवण करावीं ॥५६॥ पंचभूतिक ब्रह्मगोळ । जेणे कळे हा प्रांजळ । दृश्य सांडून केवळ । वस्तुच पाविजे ॥ ५७॥ महाद्वार बोलांडावें । मग देवदर्शन घ्यावें। तैसें दृश्य हे सांडावें । जाणोनियां ॥ ५८ ॥ दा. ८. ४.४७-६८. २१. सृष्टिकर्त्यास ओळखणे हीच उपासना. ईश्वरें केवढे सूत्र केलें । सूर्यबिंब धांवाया लाविलें। धुकटाकरवीं धरविलें । अगाध पाणी ॥२३॥