ब्रह्म्यास कोणें जन्मास घातले । विष्णूस कोणे प्रतिपाळिलें ।
रुद्रास कवणे संहारिलें । महाप्रळयीं ॥ १२ ॥
दा. ९. ७. १०-१२.
मिथ्य तेंचि जालें सत्य । सत्य तेंचि जालें असत्य ।
मायाविभ्रमाचे कृत्य । ऐसें असे पाहातां ॥ १ ॥
सत्य कळावया कारणे । बोलिली नाना निरूपणें ।
तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २ ॥
असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ जालें ।
सत्य असोन हारपलें । जेथील तेथें ॥ ३ ॥
वेदशास्त्रे पुराणे सांगती । सत्याचा निश्चय करिती ।
तरी नये आत्मप्रचिती । सत्यस्वरूप ॥ ४ ॥
सत्य असोन आच्छादलें । मिथ्या नसोन सत्य जालें ।
ऐसें विपरीत वर्तलें । देखत देखतां ॥ ५ ॥
दा. ७. १०. १-५,
या ब्रह्मांडापैलिकडिल गोष्टी । जै जाली नव्हती सृष्टि ।
मूळमाया सूक्ष्मदृष्टीं । वोळखावी ॥ ४७ ॥
सप्तकुंचक[१] प्रचंड । जाले नव्हतें ब्रह्मांड ।
मायें अविद्येचे बंड । ऐलिकडे ॥ ४८ ॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा ऐलिकडिल विचार ।
पृथ्वी मेरु सप्तसागर । ऐलिकडे ॥ ४९ ॥
- ↑ सात आवरणांचें.