पान:रामदासवचनामृत.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ रामदासवचनामृत-दासबोध.. देव देवता भुतें देवतें । चढतें सामर्थ्य आहे तेथें । येणेंचि न्यायें राक्षसांतें । सामर्थ्यकळा ॥ २४ ॥ झोटिंग वायोस्वरूप असती । सवेंच खुळखुळां चालती। खोबरी खारिका टाकून देती। अकस्मात ॥ २५ ॥ अवघेचि न्याल अभावें । तरी हे बहुतेकांस ठावें। आपुल्याला अनुभवें । विश्वलोक जाणती ॥ २६ ॥ मनुष्य धरिती शरीरवेष । नाना परकायाप्रवेश । मा तो परमात्मा जगदीश । कैसा न धरी ॥२७॥ म्हणोनि वायोस्वरूप देह धरिले । ब्रह्मा विष्णु महेश जाले। पुढे तेचि विस्तारले । पुत्रपौत्रीं ॥२८॥ दा. १०, ४. २३-२८ १६. भुते संतांस बाधा करू शकत नाहीत. तैसें देव देवता देवतें भुतें । मिथ्या म्हणों नये त्यांतें। आपलाल्या सामर्थ्य ते । सृष्टीमधे फिरती ॥ २०॥ सदा विचरती वायोस्वरूपें । स्वइच्छा पालटिती रूपें । अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पें । त्यास बाधिती ॥२१॥ ज्ञात्यास संकल्पचि असेना । म्हणोन त्यांचेन बाधवेना। या कारणे आत्मज्ञाना । अभ्यासावें ॥ २२ ॥ दा. १०. ९. २०-२२. १७. देवांचे जाणीवरूपाने अस्तित्व. जाणीव म्हणिजे अंतःकर्ण । अंतःकर्ण विष्णूचा अंश जाण । विष्णु करितो पाळण । येणे प्रकारें ॥२६॥ १ मग.