पान:रामदासवचनामृत.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५] ... तात्त्विक. कित्येक पूर्वी श्रापिले। ते शापें देह पावले । उश्रापकाळी पुन्हां आले । पूर्वदेहीं ॥९॥ कित्येकी बहुजन्म घेतले । कित्येक परकाया प्रवेशले। ऐसे आले आणि गेले। बहुत लोक ॥ १०॥ . दा. ९. ८.६-१०. वायोरूपें देवतें भुर्ते । अंगीं भरती अकस्मातें। वीध केलियां प्रेतें। सावध होती ॥ २०॥ राहाणे ब्राह्मण समंध जाती। राहाणे ठेवणीं सांपडतीं। नाना गुंतले उगवती । प्रत्यक्ष राहाणे ॥ २१॥ दा. ९. ८. २०-२१. वायोकरितां रागोद्धार । कळे वोळखीचा निर्धार। दीप लागे मेघ पडे हा चमत्कार । रागोद्धारीं ॥ ३१॥ .. दा. ९. ८. ३१. १५. देवता वायुरूपाने राहातात. देव देवता देवतें भुतें । पृथ्वीमधे असंख्यातें। परंतु या समस्तातें । वायोस्वरूप बोलिजे॥९॥ वायोस्वरूप सदा असणे । प्रसंगें नाना देह धरणें । गुप्त प्रगट होणे जाणे । समस्तांसी ॥१०॥ दा. १०. ३. ९-१० आतां रोकडी प्रचीती। मनुष्ये गुप्त प्रगटती । मौ त्या देवांच्याच मूर्ति । सामर्थ्यवंत ॥ २३ ॥ १ विधि. २ गुते. ३ मग.