पान:रामदासवचनामृत.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [१३ याचा पाहातां विचार । उदंड लांबला जोजार। . होती जाती देव नर । किती म्हणोनि ॥ १८ ॥ कीर्ति आणि अपकीर्ति । उदंड निंदा उदंड स्तुती । सर्वत्रांची भोगप्राप्ती । अंतरात्म्यासीच घडे ॥ १९॥ कोण देहीं काये करितो । कोण देहीं काये भोगितो। भोगी त्यागी वीतरागी तो । येकचि आत्मा ॥ २०॥ प्राणी साभिमानें भुलले । देहाकडे पाहात गेले। मुख्य अंतरात्म्यास चुकले । अंतरी असोनि ॥ २१ ॥ आरेया आत्मयांची चळवळ पाहे। ऐसा भूमंडळी कोण आहे। अगाध पुण्यें अनुसंधान राहे । कांहीं येक ॥ २२ ॥ त्या अनुसंधानासरिसें । जळोनि जाइजे किल्मिषं। अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसें । विवरोन पाहाती ॥ २३ ॥ अंतरानेष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले। बाह्यात्कारें भरंगळेले । लोकाचारें ॥ २४ ॥ दा. १८. १. १६-२४. . १४ देवता व भुते यांचे अस्तित्व. कित्येक प्राणी निःशेष मरती। पुन्हां मागुतें जीव येती। ढकलून दिल्हें तेणें दुःखवती । हस्तपादादिक ॥ ६॥ सर्पदृष्टि जालियावरि । ती दिवसा उठवी धन्वंतरी। तेव्हां ते माघारी । वासना येते की॥ ७॥ कित्येक सर्वे होऊन पडती। कित्येक तयास उठविती येमलोकीहून आणविती । माधारे प्राणी ॥ ८॥ १ विस्तार. २ भरकटले, फसले. ३ शवें. -