पान:रामदासवचनामृत.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३] तात्त्विक.. क्षत्रदेवं पाषाणाचा। विचार पाहातां तयाचा । तंत लागला मुळाचा । अवताराकडे ॥६॥ अवतारी देव संपले । देहे धरून वर्ती लागले। त्याहून थोर अनुमानले । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ७॥ त्यां तिही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि पाहातां । कर्ता भोक्ता तत्त्वतां । प्रत्यक्ष आहे ॥ ८ ॥ युगानयुगे तिन्ही लोक । येकचि चालवी अनेक । हा निश्चयाचा विवेक । वेदशास्त्रीं पाहावा ॥९॥ आत्मा वर्तवितो शरीर । तोचि देव उत्तरोत्तर। जाणीवरूपे कळिवर । विवेकें वर्तवी ॥१०॥ तो अंतर्देव चुकती । धांवा घेऊन तीर्था जाती। प्राणी बापुडे कष्टती । देवास नेणतां ॥११॥ मग विचारिती अंतःकरणीं । जेथें तेथें धोंडा पाणी । उगेंचि वणवण हिंडोनि । कायें होतें ॥१२॥ . ऐसा ज्यासी विचार कळला । तेणे सत्संग धरिला । सत्संगें देव सांपडला । बहुत जनासी ॥१३॥ . दा. १८. ८. १-१३. १३. आत्मा हा सर्व देवांहून श्रेष्ठ आहे. सकळ देवांचे मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ । भूमंडळी भोग सकळ । त्यासीच घडे ॥ १६॥ नाना देव होऊन बैसला । नाना शक्तिरूपें जाला। भोक्ता सकळ वैभवाला । तोचि येक ॥१७॥ १ क्षेत्रांतील देव. २ तंतु.