पान:रामदासवचनामृत.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. येक ब्रह्मविष्णुमहेश । ऐकोन ह्मणती हे विशेष। गुणातीत जो जगदीश । तो पाहिला पाहिजे ॥ २०॥ देवासि नाहीं थानमान । कोठे करावे भजन । हा विचार पाहातां अनुमान । होत जातो ॥ २१ ॥ भूमंडळी देव नाना । त्यांची भीड उलंघेना। मुख्य देव तो कळेना । काही केल्या ॥ २३ ॥ हे ज्ञानदृष्टीने पाहावें । पाहोन तेथेंचि राहावें । निजध्यासें तद्रूप व्हावें । संगत्यागें ॥२८॥ ऐसी सूक्ष्म स्थितिगती । कळतां चुके अधोगती। सद्गुरुचेनि सद्गती । तात्काळ होते ॥ ३० ॥ दा. १९. ५. १-३०. १२. अंतरात्मा सर्व देवांहून श्रेष्ठ आहे. ब्रह्म निराकार निश्चळ । आत्म्यास विकार चंचळ । तयास म्हणती सकळ । देव ऐसें ॥१॥ देवाचा ठावचि लागेना । येक देव नेमस्त कळेना । बहुत देवीं अनुमानेना। येक देव ॥२॥ म्हणोनि विचार असावा । विचारे देव शोधावा । बहुत देवांचा गोवा । पडोंचि नये ॥३॥ देव क्षेत्रीं पाहिला । त्यासारिखा धातूचा केला। पृथ्वीमधे दंडक चालिला । येणे रीती॥४॥ नाना प्रतिमादेवांचे मूळ । तो हा क्षत्रदेवचि केवळ । नाना क्षत्रे भूमंडळ । शोधून पाहावें ॥५॥ १ स्थान अथवा प्रमाण. २ गुंता.