पान:रामदासवचनामृत.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११] तात्त्विक... . माया उल्लंघाया कारणे । देवासी नाना उपाय करणें । अध्यात्मश्रवणपंथेंचि जाणे । प्रत्ययाने ॥१४॥ खोटें तें खोटेंचि खोटें । खन्यासी तगेनात बालंटें। मन अधोमुख उफराटें । केले पाहिजे ॥१७॥ अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणिजे सकळ कांहीं फावे । नाना प्रकारांचे गोवे । तुटोनि जाती ॥१८॥ पिंड पडतां अवघेचि जातें । परंतु परब्रह्म राहातें। शाश्वत समजोन मग तें। दृढ धरावें ॥३०॥ दा. २०. ९. १-३०. ११. देवांचा जो देव तो गुरूच्या योगाने कळते. - मातीचे देव धोंड्याचे देव । सोन्याचे देव रुप्याचे देव। काशाचे देव पितळेचे देव । तांब्याचे देव चित्रलेपें ॥१॥ रुविच्या लाकडाचे देव पोवळ्यांचे देव । बाण तांदळे नर्मदे देवा शालिग्राम काश्मिरी देव । सूर्यकांत सोमकांत ॥२॥ तांबनाणी हेमनाणीं। कोणी पूजिती देवार्चनीं। चक्रांकित चक्रतीर्थाहुनी । घेऊन येती॥३॥ मुळी द्रष्टा देव तो येक । त्याचे जाहाले अनेक । समजोन पाहातां विवेक । उमजों लागें ॥६॥ लोकांची पाहातां रीती। लोक देवार्चनें करिती। अथवा क्षेत्रदेव पाहाती। ठाई ठाई ॥ १८ ॥ अथवा नाना अवतार । ऐकोन धरिती निर्धार । परी ते अवघे सविस्तर । होऊन गेले ॥१९॥ १ आरोप. २ भिंतीवरची चित्रं. ३ क्षेत्रांतील देव.