पान:रामदासवचनामृत.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [r. ___ अरे जो चंचळासि ध्याईल। तो सहजचि चळेल। जो निश्चळास भजेल । तो निश्चळचि ॥ ३९ ॥ . दा. ११. २. २८-३९. १०. खग देव म्हणजे मूर्ति नव्हे. मृत्तिकापूजन करावें । आणि सर्वेचिं विसर्जावें। हैं मानेना स्वभावें । अंतःकर्णासी ॥१॥ देव पूजावा आणी टाकावा । हे प्रशस्त न वैटे जीवा। याचा विचार पाहावा । अंतर्यामीं ॥२॥ देव करिजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं। म्हणोनि याचा कांहीं। विचार पाहावा ॥३॥ देव नाना शरीरें धरितो। धरुनी मागुती सोडितो। तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें वोळखावा ॥ ४॥ सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रत्यक्ष भेटवावा देव । परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥७॥ विचार पाहातां तगेना । त्यांस देव ऐसें म्हणवेना। परंतु जन राहेना । काये करावें ॥८॥ थोर लोक मरोनि जाती । त्यांच्या सुरता करूनि पाहाती। तैसीच आहे हेही गती। उपासनेची ॥९॥ थोर व्यापार ठाकना जनीं । म्हणोनि केली रखतवानी। राजसंपदा तयाचेनी । प्राप्त कैची ॥१०॥ म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव। अज्ञाने तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११॥ १ लगेच. २ वाटे. ३ सर्व. ४ प्रतिमा, ५ मिळेना. ६ शाईचा व्यापार.