पान:रामदासवचनामृत.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.. तात्त्विक... ९. नाना देव आणि एक देव. लोक कोण्या पंथें जाती। आणि कोण्या देवास भजती। ऐसी हे रोकडी प्रचीती । सावध ऐका ॥२८॥ मृत्तिका धातु पाषाणादिक । ऐसीया प्रतिमा अनेक। बहुतेक लोकांचा दंडक । प्रतिमादेवीं ॥ २९ ॥ नाना देवांचे अवतार । चरित्रे ऐकती येक नर। जपध्यान निरंतर । करिती पूजा ॥३०॥ येक सकळांचा अंतरात्मा । विश्वीं वर्ते जो विश्वात्मा। द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा। मानिती येक ॥ ३१ ॥ येक ते निर्मळ निश्चळ । कदापी नव्हेती चंचळ। अनन्यभावें केवळ । वस्तुच ते ॥ ३२ ॥ येक नाना प्रतिमा । दुसरा अवतारमहिमा। तिसरा तो अंतरात्मा। चौथा तो निर्विकारी ॥ ३३ ॥ ऐसे हे चत्वार देव । स्सृष्टीमधील स्वभाव। या वेगळा अंतर्भाव । कोचि नाहीं॥ ३४ ॥ अवघे येकचि मानिती। ते साक्ष देव जाणती। परंतु अष्टधा प्रकृति । वोळखिली पाहिजे ॥ ३५ ॥ प्रकृतीमधील देव । तो प्रकृतीचा स्वभाव। भावातीत माहानभाव । विवेके जाणावा ॥३६॥ जो निर्मळास ध्याईल। तो निर्मळचि होईल। जो जयास भजेल । तो तद्रूप जाणावा ॥ ३७॥ क्षीर नीर निवडिती । ते राजहंस बोलिजेती। सारासार जाणती । ते माहानभाव ॥ ३८॥ १ प्रचार. .