पान:रामदासवचनामृत.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तात्त्विक. नाना मृत्तिकेनें घांसिलें । अथवा ततमुद्रेनें लांसिलें । जरी हे वरिवरी तासिलें । तरी शुद्ध नव्हे ॥ ६१॥ सेणाचे गोळे गिळिले । गोमुत्राचे मोधे घेतले । माळा रुद्राक्ष घातले । काष्ठमणी ॥ ६२ ॥ वेश वरीवरी केला । परी अंतरी दोष भरला ॥ त्या दोषाच्या दहनाला । आत्मज्ञान पाहिजे ॥ ६३ ॥ नाना व्रतें नाना दानें । नाना योग तीर्थाटणें । सर्वांहून कोटिगुणें । महिमा आत्मज्ञानाचा ॥ ६४ ॥ आत्मज्ञान पाहे सदा । त्याच्या पुण्यासी नाही मर्यादा । दुष्ट पातकाची बाधा । निरसोन गेली ॥६५॥ वेदशास्त्रीं सत्यस्वरूप । तेंचि ज्ञानियाचें रूप । पुण्य जालें अमूप । सुकृतें सीमा सांडिली ॥६६॥ या प्रचितीच्या गोष्टी । प्रचित पहावी आत्मदृष्टी। प्रचिती वेगळे कष्टी । होऊच नये ॥ ६७॥ आगा ये प्रचितीचे लोक हो।प्रचित नस्तां अवघा शोक हो। रघुनाथकृपेनें राहो । प्रत्यय निश्चयाचा ॥ ६८॥ ___ दा. १०. १०. ५९-६८. ८. मूर्ति म्हणजे देव नव्हे. पाषाणाचा देव केला। एके दिवशीं भंगोन गेला । तेणें भक्त दुःखवला । रडे पडे आक्रंदे ॥ ३३ ॥ देव हारपला घरीं। येक देव नेला चोरी। येक देव दुराचारी। फोडिला बळें ॥३४॥ १ भाजलें, हागले. २ अमर्याद.