पान:रामदासवचनामृत.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___रामदासवचनामृत-दासबोध. [ ६ कोणासीच नाही बंधन । भ्रांतिस्तव भुलले जन । दृढ घेतला देहाभिमान । म्हणौनियां ॥ ५७ ॥ शिष्या येकांतीं बैसावें । स्वरूपी विश्रांतीस जावें। तेणें गुणें दृढावे । परमार्थ हा ॥५८॥ अखंड घडे श्रवण मनन । तरीच पाविजे समाधान । पूर्ण जालिया ब्रह्मज्ञान । वैराग्य भरे आंगीं ॥ ५९॥ शिष्या मुक्तपणे अनर्गळं । करिसी इंद्रिये बाष्कळ । तेणे तुझी तळमळ । जाणार नाहीं ॥६॥ विषई वैराग्य उपजलें । तयासीच पूर्ण ज्ञान जालें। मणी टाकितांची लाधलें। राज्य जेवीं॥६१॥ मणी होतां सीगटाचा । लोभ धरूनियां तयाचा। मूर्खपणे राज्याचा । अव्हेर केला ॥ ६२ ॥ ऐक शिष्या सावधान । आतां भविष्य मी सांगेन । जया पुरुषास में ध्यान । तयास तेंचि प्राप्त ॥ ६३॥ म्हणोनि जे अविद्या । सांडून धरावी सुविधा। तेणें गुणें जगद्वंद्या । पाविजे सीघ्र ॥ ६४ ॥ . दा. ५. ६. १-६४. ७. आत्मज्ञानाच्या योगाने सर्व पातकांचा व दुःखांचा नाश होतो. पापाचे वळलें शरीर । पापाच घडे तदनंतर। अंतरीं रोग वरिवरी उपचार । काय करी ॥ ५९॥ नाना क्षेत्री हे मुंडिलें । नाना तीर्थों में दंडिलें। नाना निग्रहीं खंडिलें । ठाई ठाई ॥ ६०॥ १ अनिर्बद्ध. २ शिंगाचा. ३ घडलें. .