पान:रामदासवचनामृत.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६] . तात्त्विक.. ऐक शिष्या येथीचें वर्म । स्वयें तूंचि आहेसी ब्रह्म। येविषई संदेह भ्रम । धरूंचि नको ॥ ४५ ॥ नवविधा प्रकारें भजन । त्यांत मुख्य तें आत्मनिवेदन। ते समग्रप्रकारें कथन । कीजेल आतां ॥४६॥ निर्माण पंचभूतें यीयें। कल्पांतीं नासती येथान्वयें। प्रकृति पुरुष जियें । तेही ब्रह्म होती ॥४॥ दृश्य पदार्थ आटतां । आपणहि नुरे तत्वतां । ऐक्यरूपें ऐक्यता। मुळीच आहे ॥४८॥ सृष्टीची नाहीं वार्ता । तेथें मुळीच ऐक्यता। पिंडब्रह्मांड पाहों जातां । दिसेल कोठे ॥ ४९ ॥ ज्ञानवन्ही प्रगटे । तेणें दृश्य केरें आटे। तदाकारें मूळ तुटे। भिन्नत्वाचें ॥ ५० ॥ मिथ्यत्वें वृत्ति फिरे । तो दृश्य असतांच ओसरे। . सहजचि येणेप्रकारें । जालें आत्मनिवेदन ॥ ५१॥ असो गुरूचे ठाई अनन्यता । तरी तुजसी कायेसी रेचिंता। वेगळेपणे अभक्ता। उरोंचि नको ॥५२॥ आतां हेचि दृढीकर्ण । व्हावया करी सद्गुरुभजन । सद्गुरुभजनें समाधान । नेमस्त आहे ॥ ५३॥ या नाव शिष्या आत्मज्ञान । येणे पाविजे समाधान । भवभयाचे बंधन । समूळ मिथ्या ॥ ५४॥ देह मी वाटे ज्या नरा। तो जाणावा आत्महत्यारा। देहाभिमाने येरझारा । भोगिल्याच भोगी ॥ ५५ ॥ असो चहूं देहावेगळा । जन्मकर्मासी निराळा । सकळ आबाळगोबळा । सबाह्य तूं ॥ ५६ ॥ १ इये, हीं. २ कस्पटासमान, तुच्छ. ३ गघाळा. ४ बाहेर.