पान:रामदासवचनामृत.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

PHD रामदासवचनामृत-दासबोध. आतां नलगे संस्कृत । अथवा ग्रंथ प्राकृत । माझा स्वामी कृपेसहित । हृदई वसे ॥ ३४ ॥ न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवण सायास। प्रेत्नेविण सौरसं । सद्गुरुकृपा ॥ ३५ ॥ ग्रंथ मात्र महाष्ट । त्याहून संस्कृत श्रेष्ठ । त्या संस्कृतामधे पष्टं। थोर तो वेदांत ॥ ३६॥ त्या वेदांतापरतें कांहीं। सर्वथा श्रेष्ठ नाहीं। जेथें वेदगर्भ सर्वही । प्रगट जाला ॥ ३७ ॥ असो ऐसा जो वेदांत । त्या वेदांताचाही मथितार्थ । अतिगहन जो परमार्थ । तो तूं ऐक आतां ॥ ३८ ॥ अरे गहनाचेहि गहन । तें 1 जाण सद्गुरुवचन । सद्गुरुवचनें समाधान । नेमस्त आहे ॥ ३९ ॥ सद्गुरुवचन तोचि वेदांत । सद्गुरुवचन तोचि सिद्धांत । सद्गुरुवचन तोचि धादांत । सप्रचीत आतां ॥ ४० ॥ जें अत्यंत गहन । माझ्या स्वामीचें वचन । जेणें माझें समाधान । अत्यंत जालें ॥४१॥ तें हे माझें जिवीचे गुज । मी सांगेन म्हणतो तुज। जरी अवधान देसी मज । तरी आतां येच क्षणीं ॥४? शिष्य म्लान वदनें बोले । धरिले सदृढ पाउले। मग बोलों आरंभिलें । गुरुदेवें ॥ ४३ ॥ अहं ब्रह्मास्मि माहावाक्य । येथीचा अर्थ अतयं । तोही सांगतो ऐक्य । गुरुशिष्य.जेथें ॥ ४४ ॥ १ सुलभ. २ सष्ट,