पान:रामदासवचनामृत.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६] तात्त्विक. व्यास वसिष्ठ महामुनी । शुकनारद समाधानी। जनकादिक महाज्ञानी । येणेंचि ज्ञानं ॥ २३ ॥ वामदेवादिक यागेश्वर । वाल्मीक अत्रि ऋषेश्वर। .. शौनिकादि अध्यात्मसार । वेदांतमते ॥ २४॥ सनकादिक मुख्य करूनी। आदिनाथ मीन गोरक्षमुनी। आणीक बोलतां वचनीं । अगाध असती ॥ २५॥ सिद्ध मुनी माहानुभाव । सकळांचा जो अंतर्भाव । जेणें सुखें माहादेव । डुल्लत सदा ॥२६॥ जें वेदशास्त्रांचे सार । सिद्धांत धादांत विचार । ज्याची प्राप्ती भाग्यानुसार । भाविकांस होये ॥ २७ ॥ साधुसंत आणी सज्जन । भूत भविष्य वर्तमान । सर्वत्रांचे गुह्यज्ञान । तें सांगिजेल आतां ॥ २८ ॥ तीर्थे व्रतें तपेंदाने । जें न जोडें धूम्रपानें। पंचाग्नी गोरांजने । जे प्राप्त नव्हे ॥ २९॥ सकळ साधनांचे फळ । ज्ञानाची सिगंची केवळ । जेणें संशयाचे मूळ । निशेष तुटे ॥ ३०॥ छपन्न भाषा तितुके ग्रंथ । आदिकरून वेदांत । या इतुकियांचा गहनार्थ । येकचि आहे ॥ ३१ ॥ जे नेणवे पुराणीं । जेथें सिणल्या वेदवाणी । तेंचि आतां येचि क्षणीं । बोधीन गुरुकृपें ॥ ३२ ॥ पाहिलें नस्तां संस्कृतीं। रीग नाहीं महाष्ट ग्रंथीं। हृदई वसल्या कृपामूर्ती । सद्गुरु स्वामी ॥ ३३ ॥ १ कित्येक. २ आत्मसाक्षात्कार. ३ एक प्रकारचे अग्निसाधन. ४ शेवट. ५ प्रवेश