पान:रामदासवचनामृत.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

4 . . . . । रामदासवचनामृत-दासबोध. [६. माहावाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार। त्याच्या जपें अंधकार । न फिटे भ्रांतीचा ॥१२॥ माहावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि तत्त्वतां । त्याचा जपं करितां वृथा । सीणचि होये ॥ १३॥ माहावाक्याचे विवरण । हे मुख्य ज्ञानाचे लक्षण। शुद्ध लक्ष्यांशे आपण । वस्तुच आहे ॥१४॥ आपला आपणासि लाभ । हे ज्ञान परम दुल्लभ। जें आदिअंती स्वयंभ । स्वरूपंचि स्वयें ॥ १५॥ जेथून हे सर्वही प्रगटे । आणी सकळही जेथें आटे। तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ॥१६॥ मते आणि मतांतरें । जेथें होती निर्विकारें। अति सूक्ष्म विचारें। पाहातां ऐक्य ॥१७॥ जें या चराचराचें मूळ । शुद्धं स्वरूप निर्मळ । या नाव ज्ञान केवळ । वेदांतमतें ॥ १८ ॥ शोधितां आपले मूळस्थान । सहजचि उडे अज्ञान । या नाव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायेक ॥ १९ ॥ आपणासि वोळखों जातां । आंगीं बाणे सर्वज्ञता। तेणे एकदेसी वार्ता । निशेष उडे ॥ २०॥ मी कोण ऐसा हेत । धरून पाहातां देहातीत । अवलोकिता नेमस्त । स्वरूपचि होये ॥ २१ ॥ असो पूर्वी थोर थोर । जेणे ज्ञाने पैलपार । · पावले ते साचार । ऐक आतां ॥ २२ ॥ .. । १ दुर्लभ.