पान:रामदासवचनामृत.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। तात्त्विक. ६. ज्ञान म्हणजे काय ? ऐक ज्ञानाचे लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान । पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ॥१॥ मुख्य देवास जाणावें । सत्यस्वरूप वोळखावें । नित्यानित्य विचारावें । या नाव ज्ञान ॥२॥ जेथें दृश्यप्रकृति सरे । पंचभातक वोसरे। समूळ द्वैत निवारे । या नाव ज्ञान ॥३॥ मनबुद्धिअगोचर । न चले तर्काचा विचार। उलेख परेहूनि पर। या नाव ज्ञान ॥४॥ जेथें नाहीं दृश्यभान । जेथे जाणीव हे अज्ञान। विमळ शुद्ध स्वरूपज्ञान यासि बोलिजे ॥५॥ सर्वसाक्षी अवस्ता तुर्यो । ज्ञान ऐसें म्हणती तया। परी ते जाणिजे वायां । पदार्थज्ञान ॥६॥ दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे। शुद्धस्वरूप जाणिजे । या नाव स्वरूपज्ञान ॥७॥ जेथें सर्वचि नाही ठाईचें । तेथे सर्वसाक्षित्व कैंचें। म्हणौनि शुद्ध ज्ञान तुर्येचें । मानूंचि नये ॥ ८॥ ज्ञान म्हणजे अद्वैत । तुर्या प्रत्यक्ष द्वैत । म्हणौनि शुद्ध ज्ञान तें संतत । वेगळेचि असें ॥९॥ ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण । शुद्ध स्वरूपचि आपण । या नाव शुद्ध स्वरूपज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १० ॥ माहावाक्य उपदेश भला। परी त्याचा जप नाहीं बोलिला। तेथींचा तो विचारचि केला पाहिजे साधकें ॥११॥ १ उल्लेख, निर्देश. २ चतुर्थावस्था. ३ सत्य. ४ स्वतंत्र, अगर नेहमी.