पान:रामदासवचनामृत.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [५ नेमकचि बोलणें । तत्काळचि प्रतिवचन देणें ॥ सीघ्रचि कवित्व करणें । हे ज्ञान नव्हे ॥ २६ ॥ नेत्रपालवी नादकळा । करपालवी भेदकळा। स्वरपालवी संकेतकळा । हे ज्ञान नव्हे ॥ २७॥ काव्यकुशळ संगीतकळा । गीतप्रबंध नृत्यकला। सभाचातुर्य शब्दकळा । हे ज्ञान नव्हे ॥ २८॥ नाना लाघवें चित्रकळा । नाना वायें संगीत कळा। नाना प्रकारे विचित्र कळा । हे ज्ञान नव्हे ॥ ३०॥. आदिकरूनि चौसष्टि कळा । याहि वेगळ्या नाना कळा। चौदा विद्या सिद्धि कळा । हे ज्ञान नव्हे ॥ ३१ ॥ असो सकळ कळाप्रवीण । विद्यामात्रपरिपूर्ण । तरी ते कौशल्यता परी ज्ञान । ह्मणोंचि नये ॥ ३२ ॥ .. हे ज्ञान होयसें भासे । परंतु मुख्य ज्ञान तें अनारिसें । जेथें प्रकृतीचे पिसें । समूळ वावै ॥ ३३ ॥ जाणावें दुसऱ्याचे जीवीचें । हे ज्ञान वाटे साचें। परंतु हे आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ॥ ३४ ॥ माहानुभाव महाभला । मानसपूजा करितां चुकला। कोणी येके पाचारिला । ऐसें नव्हे म्हणोनि ॥ ३५ ॥ ऐसी जाणे अंतरस्थिती । तयासी परमज्ञाता म्हणती। परंतु जेणे मोक्षप्राप्ती । तें हें ज्ञान नव्हे ॥ ३६॥ बहुत प्रकारीची ज्ञानें। सांगों जातां असाधारणे। सायोज्यप्राप्ती होये जेणें । तें ज्ञान वेगळे ॥ ३७॥ दा. ५. ५. ३-३७. १ वेगळं. २ पेड. ३ व्यर्थ.