रघुनाथ स्मराेनि कार्य करावें । तें तात्काळचि सिद्धी पावे।
कर्ता राम हे असावें । अभ्यांतरीं ॥३३॥
कर्ता राम मी नव्हे आपण । ऐसें सगुणनिवेदन ।
निर्गुणीं तें अनन्य । निर्गुणचि होइजे ॥ ३४ ॥
मी कर्ता ऐसें म्हणतां । कांहींच घडेना सर्वथा ।
प्रचित पाहासी तरी आतां । सीघ्रचि पाहे ॥ ३५ ॥
मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी ।
राम कर्ता म्हणतां पावसी । येश कीर्ती प्रताप ॥ ३६॥
दा. ६. ७. २१-३६.
भूत भविष्य वर्तमान । ठाउके आहे परिच्छिन्न[१] ।
यासीहि म्हणिजे तें ज्ञान । परी ते ज्ञान नव्हे ॥ ३ ॥
बहुत केलें विद्यापठण । संगीत शास्त्र रागज्ञान ।
वैदिक शास्त्र वेदाधेन[२] । हेही ज्ञान नव्हे ॥ ४ ॥
नाना वनितांची परीक्षा । नाना मनुष्यांची परीक्षा ।
नाना नरांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ ६ ॥
नाना अश्वांची परीक्षा । नाना गजांची परीक्षा ।
नाना श्वापदांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ ७ ॥