पान:रामदासवचनामृत.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [ रघुनाथ स्मरानि कार्य करावें । तें तात्काळचि सिद्धी पावे।। कर्ता राम हे असावें । अभ्यांतरीं ॥३३॥ कर्ता राम मी नव्हे आपण । ऐसें सगुणनिवेदन । निर्गुणीं तें अनन्य । निर्गुणचि होइजे ॥ ३४ ॥ मी कर्ता ऐसें म्हणतां । कांहींच घडेना सर्वथा। प्रचित पाहासी तरी आतां । सीघ्रचि पाहे ॥ ३५ ॥ मी कर्ता ऐसें म्हणसी। तेणें तूं कष्टी होसी । राम कर्ता म्हणतां पावसी । येश कीर्ती प्रताप ॥ ३६॥ दा. ६. ७. २१-३६. २. तात्त्विक. - ५. ज्ञानाचें व्यतिरेकात्मक वर्णन. भूत भविष्य वर्तमान । ठाउके आहे परिच्छिन्ने । यासीहि म्हणिजे तें ज्ञान । परी ते ज्ञान नव्हे ॥ ३॥ बहुत केलें विद्यापठण । संगीत शास्त्र रागज्ञान । वैदिक शास्त्र वेदाधेनं । हेही ज्ञान नव्हे ॥ ४ ॥ नाना वनितांची परीक्षा । नाना मनुष्यांची परीक्षा। नाना नरांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥६॥ नाना अश्वांची परीक्षा । नाना गजांची परीक्षा। नाना श्वापदांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ ७॥ . १ संपूर्ण. २ अधेन = अध्ययन,