त्याचे आम्ही सेवकजन । सेवेकरितां जालें ज्ञान ।
तथे अभावं[१] धरितां पतन । पाविजेल की ॥२२॥
गुरु सांगती सारासार । त्यास कैसें म्हणावे असार ।
तुज काय सांगणे विचार । शाहाणे जाणती ॥२३॥
समर्थाचे मनींचें तुटे । तेंचि जाणावें अदृष्ट खोटें ।
राज्यपदापासून करंटें । चेवलें[२] जैसें ॥ २४ ॥
मी थोर वाटे मनीं । तो नव्हे ब्रह्मज्ञानी ।
विचार पाहतां देहाभिमानी । प्रत्यक्ष दिसे ॥ २५ ॥
वस्तुभजन करीना । ना न करी ऐसेंही म्हणेना ।
तरी हे जाणावी कल्पना । दडोन राहिली ॥ २६ ॥
ना ते ज्ञान ना तें भजन । उगाचि आला देहाभिमान ।
येथे नाही किं अनुमान । प्रत्यय तुझा ॥ २७॥
तरी आतां ऐसें न करावें । रघुनाथभजनी लागावें ।
तेणेचि ज्ञान बोलावें । चळेना ऐसें ॥२८॥
करी दुर्जनाचा संहार । भक्तजनासी आधार ।
ऐसा हा तो चमत्कार । रोकडा[३] चाले ॥ २९॥
मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेचि नासोन जातें ।
कृपा केलियां रघुनाथें । प्रचित येते ॥३०॥
रघुनाथभजने ज्ञान झालें । रघुनाथभजने महत्त्व वाढले ।
म्हणौनियां तुवां केलें । पाहिजे आधीं ॥ ३१॥
हे तो आहे सप्रचित । आणि तुज वाटेना प्रचित ।
साक्षात्कारें नेमस्त । प्रत्ययो करावा ॥३२॥
पान:रामदासवचनामृत.pdf/48
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
§ ४ ]
५
प्रासंगिक