Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ § 3
रामदासवचनामृत-दासबोध.

करी आपुला व्यासंग । कदापि नोहे ध्यानभंग ।
बोलणे चालणे वेंग[] । पडोंच नेदी ॥२१॥
जे वडिली निर्माण केलें। तें पाहिजे पाहिले ।
काये काये वडिलीं केलें । किती पाहावें ॥ २२ ॥
तो वडिल जेथें चेतला[] । तोचि भाग्यपुरुष जाला ।
अल्प चेतने तयाला । अल्पभाग्य ॥२३॥
तया नारायणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं ।
मग ते लक्ष्मी तयापासुनी । जाईल कोटें ॥२४॥
नारायेण असे विश्वीं । त्याची पूजा करीत जावी ।
याकारणें तोषवावी । कोणी तरी काया॥ २५॥
उपासना शोधून पाहिली । तो ते विश्वपाळिती[] जाली ।
न कळे लीळा परीक्षिली। न वचे कोणा ॥२६॥
देवाची लीळा देवविण । आणीक दुसरा पाहे कोण ।
पाहाणे तितुकें आपण । देवाच असे ॥२७॥
उपासना सकळां ठाई । आत्माराम कोठे नाही ।
याकारणे ठाई ठाई । रामें आटोपिलें[] ॥ २८ ॥
ऐसी माझी उपासना । आणितां नये अनुमाना ।
नेऊनि घाली निरंजना- । पैलीकडे ॥ २९॥

दा. १५. ९. १८-२९.

४. रामदासांची रामभक्ति.

आमुचे कुळी रघुनाथ । रघुनाथें आमुचा परमार्थ ।
जो समर्थाचाहि समर्थ। देवां सोडविता ॥ २१॥


  1. व्यंग.
  2. प्रकाशित जाला.
  3. विश्वाचे पाळण करणारी.
  4. व्यापिलें