Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
§ 3]
प्रासंगिक

गुरुत्व आलें नीच याती। कांहींएक वाढली महंती।
शूद्र आचार बुडविती । ब्राह्मणांचा ॥ ३४ ॥
हे ब्राह्मणास कळेना । त्याची वृत्तिच वळेना ।
मिथ्या आभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥ ३५॥
राज्य नेलें म्लेंचि क्षेत्रीं[] । गुरुत्वं नेले कुपात्रीं ।
आपण अरत्रीं ना परत्रीं[] । कांहींच नाहीं ॥३६॥
ब्राह्मणास ग्रामणीने[] बुडविलें । विष्णूने श्रीवत्स मिरविलें।
त्याच विष्णूने श्रापिलें । फरशरामें ॥ ३७॥
आम्हीही तेचि ब्राह्मण । दुःखें बोलिलें हे वचन ।
वडिल गेंले ग्रामणी करून । आम्हांभोवते ॥ ३८ ॥
आतांचे ब्राह्मणी काय केलें । अन्न मिळेना ऐसें जालें ।
तुम्हां बहुतांचे प्रचितीस आलें । किंवा नाहीं ॥३९॥
बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्मणांचे अदृष्ट जाणावें ।
प्रसंगें बोलिलें स्वभावें । क्षमा केले पाहिजे॥४०॥

दा. १४. ७. २९-४०.

३. रामदासांचे स्वतःच्या उपासनेचे वर्णन.

सकळांवडिल अंतरात्मा । त्यासि नेणे तो दुरात्मा ।
दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा । अंतरला तया ॥१८॥
जवळी असोन चुकलें। प्रत्ययास नाहीं सोकलें[]
उगेंचि आले आणि गेलें । देवाचकरितां ॥१९॥
म्हणौन सकळां वडिल देव । त्यासी होतां अनन्यभाव ।
मग हे प्रकृतीचा स्वभाव । पालटों लागे ॥२०॥


  1. क्षत्रियांनी
  2. येथें ना तेथे.
  3. ग्रामण्याने.
  4. मिळविलें.