पान:रामदासवचनामृत.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. येश कीर्ती प्रताप महिमा। उत्तम गुणासी नाहीं सीमा। नाही दुसरी उपमा । देणे ईश्वराचें ॥१६॥ देव ब्राह्मण आचार विचार । कितेक जनासी आधार । सदा घडे परोपकार । देणे ईश्वराचें ॥१७॥ येहलोक परलोक पाहाणें । अखंड सावधपणे राहाणे। बहुत जनाचे साहाणें । देणे ईश्वराचें ॥१८॥ देवाचा कैपक्ष घेणें । ब्राह्मणां चिंता वाहाणें। बहुत जनासी पाळणें । देणे ईश्वराचें ॥१९॥ धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार। जाले आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचें ॥२०॥ दा. १८. ६. ९-२०. २. ब्राह्मणांच्या दुःस्थितीबद्दल रामदासांचे उद्गार. नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला। वेदशास्त्रब्राह्मणाला। कोण पुसे ॥२९॥ ब्रह्मज्ञानाचा विचारु । त्याचा ब्राह्मणासीच अधिकार। वर्णानां ब्राह्मणो गुरुः । ऐसें वचन ॥३०॥ ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले। गुरुत्व सांडून जाले। शिष्य शिष्यांचे ॥३१॥ कित्येक दावलमलकांस जाती। कित्येक पीरास भजती। कित्येक तुरुक होती। आपले इच्छेनें ॥३२॥ ऐसा कलियुगींचा आचार । कोठे राहिला विचार। पुढे पुढे वर्णसंकर। होणार आहे ॥ ३३॥ १ कैवार. २ मुसलमानांचा एक अवलिया.