पान:रामदासवचनामृत.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत (दासबोध) १. प्रासंगिक । १. रामदासांचा शिवाजीस उपदेश. बरें ईश्वर आहे साभिमानी। विशेष तुळजा भोवानी। परंतु विचार पाहोनि । कार्ये करणे ॥९॥ अखंडचि सावधाना । बहुत काये करावी सूचना। .. परंतु काहीं येक अनुमाना। आणिले पाहिजे ॥१०॥ समर्थापासी बहुत जन । राहिला पाहिजे साभिमान । निश्चय करूनियां मन । लोक असती ॥११॥ म्लेंच दुर्जन उदंड। बहुतां दिसांचे माजलें बंड। या कारणे अखंड । सावधान असावें ॥१२॥ सकळकर्ता तो ईश्वर । तेणें केला अंगिकारूं। तया पुरुषाचा विचारु । विरुळा जाणे ॥१३॥ न्यायनीति विवेक विचार । नाना प्रसंग प्रकार। परीक्षणे परांतर । देणे ईश्वराचें ॥१४॥ महायेत्न सावधपणें । समई धारिष्ट धरणे। अद्भतचि कार्य करणे । देणे ईश्वराचें ॥१५॥