पान:रामदासवचनामृत.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

L U . . - -


- L AI . ..... .. . . . ..LLA J .. . प्रस्तावना २३ तीस रामदासांनी प्रार्थना केली आहे.क्रमांक ११३ मध्ये शिवाजीचे देवब्राह्मणांच्या "संरक्षणाबद्दल अभिनंदन करून शेवटी उदंड राजकारण तटल्यामुळे तुमच्या देशांत वास्तव्य केले असतांही तुम्ही आमचें वर्तमान घेतले नाही याबद्दल खेद प्रदर्शित करून शिवाजीचे मन जास्तच आपल्याकडे रामदासांनी ओढून घेतले आहे. क्रमांक ११४ मध्ये क्षत्रियांचे काम म्हटलें म्हणजे मारतां मारतां मरणे हे होय; अशा शूर क्षत्रियांनी तकवा न सोडितां तलवार चालविली असतां जय अवश्यमेव प्राप्त होतो; मराठा तितका मेळवून आपला महाराष्ट्रधर्म वाढविला पाहिजे; देवधर्माचें उच्छेदन झाल्यास त्यापेक्षा मृत्यु बरा असा क्षात्रधर्म सांगितला आहे.क्रमांक ११५मधील सनदेंत चाफळच्या स्थापनेपासून शिवाजीचा व रामदासांचा जो संबंध घडून आला त्याबद्दलचा साद्यंत इतिहास शिवाजीने लिहिला आहे हे वर सांगितलेच आहे. क्रमांक ११६मध्ये "आनंदवनभुवन" या नांवाच्या प्रकरणांत रामदासांनी पुढे होणार ते पाहून बायबलमधील सेंट जॉनप्रमाणे आपले विचार प्रकट केले आहेत. मुख्य देवच उठल्यावर इतरांची किंमत काय ? अभक्तांचा क्षय होऊन हिंदुस्थान बळावलें आहे, औरंगजेबाचे राज्य नष्ट होऊन पूर्वीप्रमाणे सुराज्य स्थापन झाले आहे, रामवरदायिनी माता हातांत गर्द घेऊन रायासमागमें चालली आहे, व पूर्वीप्रमाणेच पुढेही भक्तांचे रक्षण करीत आहे, असें रामदासांनी पाहिलेले दिव्यदर्शन या आनंदवनभुवनांत त्यांनी प्रथित केले आहे. अशाप्रकारचे उद्गार वाचल्यावर रामदास राजकारणी नव्हते असे कोण म्हणेल ! २३. रामदासांचे गुरु कोण असा एक प्रश्न नेहमी विचारण्यांत येतो. त्याचे उत्तर रामदासांनी क्रमांक ११७ मध्ये दिले आहे. त्यावरून रामचंद्राचा दृष्टांत होऊन रामदासांस मंत्र मिळाला असावा असे दिसते. मारुतीची उपासना रामचंद्रांनी दृष्टांतांत सांगितल्याप्रमाणे रामदासांनी केली असें त्यांत लिहिले आहे. क्रमांक ११८ मध्ये रामदासांनी आपल्या पित्यास म्हणजे सूर्याजीपंतांस गांवाबाहेर भीमदेवालयामध्ये रामलक्ष्मणांपासून उपदेश कसा झाला, तुझे पुत्र रामदास्याचा ध्वज उभारतील असा वर त्यास कसा मिळाला, शेवटी वडिलांच्या निधनानंतर ज्येष्ठ बंधूंनी मंत्र न सांगितल्यामुळे रामदासांसही त्याच देवालयांत रामाचा दृष्टांत कसा झाला, हे बालपणीचें आपलें चरित्रकथन रामदासांनी केले आहे. क्रमांक १.१९ मध्ये हनुमंतवेलीवरून राममंडपावर चढून आत्मज्ञानाचे फळ आपल्यास कसें प्राप्त झाले हे रामदासांनी सुंदर रीतीने सांगितले आहे. क्रमांक १२० मध्ये मनास मागे टाकणाऱ्या प्राणदात्या मारुतीची उपासना त्यांनी सांगितली आहे. शेवटी तेरा अक्षरी मंत्राचा तेरा कोटि जप केल्यास देवाचे दर्शन होईल असें रामदासांनी अभिवचन दिले आहे (क्र. १२२). २४. रामदासांची पदें, अभंग, वगैरे तुकारामज्ञानेश्वरांच्या इतकी जरी संख्येने नसली तरी त्यांतील शिकवण ज्ञानेश्वरतुकारामांच्या प्रमाणेच ईश्वरप्राप्ती