पान:रामदासवचनामृत.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ रामदासवचनामृत ची आहे. कोणत्याही स्थितीत आपण राघवाची कास सोडूं नये (क्र. १२३). आपण हजारों अन्याय केले तरी अनुताप झाल्यास गुरु क्षमा. करतील (क्र. १२४); शिंक, जांभई, खोकला इतका काळही आपण व्यर्थ जाऊं देता कामा नये (क. १२६); अशाने एकदम थोर लाभ होतो (क.. १२७) साधनांची खटपट व्यर्थ ठरते (क्र. १२८); गृहांत अगर वनांत सारखेच रामदर्शन होतें (क्र. १२९); एकदां रामाचे दर्शन झाल्यावर पुनः राम विन्मुख होत नाही ( क्र. १३०); राम व विठ्ठल हे सारखेच आहेत; जसा भाव तसा देव ( क्र. १३१ ); अशी शिकवण रामदासांनी आपल्या अभंगांत व पदांत केली आहे. २५. स्फुट प्रकरणांत शक्ति व युक्ति या दोन्हींखेरीज काम चालत नाही असें सांगून सर्व प्राणिमात्रांच्या शरीरांत खेळणारी विश्वव्यापिनी शक्ति, अगर भवानी माता, इला आपण हुडकून काढली असें रामदासांनी सांगितले आहे (क्र.१३२). देव व देउळे यांमधील भेद लोक मानीत नाहीत; देवळासाठींच लोक भांडतात, त्यांस देव चुकवून राहतो; देव मोठा ठक असल्याने जीर्ण देवालयें तो सोडून जातो; ब्रह्मा, विष्णु महेश्वर, हे देव नसून ती देवालयेच होत; अशा त्या निश्चल देवाचें ध्यान सर्वांनी करावें असें रामदासांनी पुनः सांगितले आहे ( क्र. १३३). क्रमांक १३४ हा उतारा आजपर्यंत अप्रसिद्ध होता. तो रा. शंकर श्रीकृष्ण देव व रा. गणेश गोविंद कारखानीस यांच्यामुळे आम्हांस प्रकाशित करण्यास सांपडला आहे, याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहोत. या उताऱ्यांत गुरुशिष्यसंवादरूपाने दासबोधाचा सोलीव अर्थ दिला आहे. ईश्वरसाक्षात्काराच्या वाटेत जे नानाप्रकारचे अनुभव येतात ते यांत कल्याण व रामदास यांच्या. संवादांत अथित केले असल्याने या उताऱ्याचे फारच महत्त्व आहे हे सांगावयास नको. क्रमांक १३५ मध्ये ज्ञानदेवांनी “धर्म जागो निवृत्तीचा " असें में सुंदर पद केले आहे त्याबरहुकूम रामदासांनी " राघवाचा धर्म जागो" अशा तिीचें पद करून देवास “मागणे निरसे जेणें । ऐसें देगा रामराया " अशा प्रकारचे एकच मागणे मागितले आहे. हे सर्व पद बहारीचे असल्याने रामदासांच्या निष्कामभक्तीचा येथे कळसच झाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. २६. या ग्रंथाचे कामी रा. सा. वासुदेवराव दामले, रा. गणेश गोविंद कारखानीस, रा. शंकर केशव धर्माधिकारी, व रा. जगन्नाथ रघुनाथ लेले या सर्वांची जी मदत झाली आहे, त्याबद्दल मी त्या सर्वांचा फार आभारी आहे.. आर्यभूषण छापखान्याच्या चालकांनी फार मेहनत घेऊन व झीज सोसून हे पुस्तक छापून दिले त्याबद्दल मी त्यांचाही फार आभारी आहे. रा. द. रानडे -