पान:रामदासवचनामृत.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ रामदासवचनामृत १०४); सर्व सोडून एकदम निघून जावें असें मनास वाटते, व उपाधीस देखन कंटाळा येतो (क. १०५.); विषयकर्दमांत लोळत असतां मला चिळस उपजत नाही ( क. १०६); मी टोणपा झालो असल्याने मनांत फार उद्वेग वाटतो तुला उदंड भक्त असल्याने तूं आम्हांस कशास विचारशील ( क्र. १०७ ); तुझ्या साधूचे रुपणपण लोकांत न दिसावें म्हणून तुझ्या सामर्थ्याचा अल्प वांटा मी मागत आहे ( क. १०८); अशा प्रकारचे रामदासांचे करुणाष्टकांतील उद्गार फार हृदयस्पर्शी आहेत. या करुणावचनांवरून ज्ञान व भक्ति यांची रामदासांत किती उत्तम सांगड होती हे दिसून येईल. २२. ज्ञान व भक्ति यांबरोबरच समर्थांचा जो राजकारणातील कर्मयोग होता तोही फार अवर्णनीय होता. रामदास हे राजकारणी नसून ते केवळ "मोक्षगरु" अगर " धर्मगुरु " होते हैं मत आमच्या ऐतिहासिक प्रकरणांतील उतारे जे वाचतील त्यांस सहजच सदोष वाटणार आहे. क्रमांक १०९ मध्ये रामदास हेळवाकच्या घळीतून चाफळास कसे आले, तेथे त्यांची व्याधीही कशी... बरी झाली, रघुनाथभटजीवर त्यांचे प्रेम किती होते, आपल्या शिष्यांविषयी निकट भाव त्यांचे ठायी किती वसत होता, हे त्यांच्या स्वहस्तलिखित. पत्रावरुन सहज दृग्गोचर होणार आहे ( क्र. १०९). क्रमांक ११० वरून रामदासांनी देशोदेशी विखुरलेल्या आपल्या निरनिराळ्या महंतांस सांप्रदाय वाढविण्याविषयी कशी आज्ञा केली होती ते व्यक्त होत आहे. “समुदाय" करणे हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य धडा होता. जवळच्या सोयऱ्याधायांच्या मुलांस एकांतांत बोलावून ईश्वराचे भजन करावे असे त्यांस सांगून जप देऊन नंतर आम्हांकडे पाठवावें म्हणजे आम्ही त्यांचा गोवा उगवून घेऊं, असें रामदासांनी आपल्या भक्तांस सांगितले आहे. क्रमांक १११ मध्ये सुंदरमठ अगर शिवथर येथील घळीचे रामदासांनी सुंदर वर्णन केले आहे तें पहावें. तोच समर्थ देव की ज्याने आपल्या शिण्यास सुद्धा समर्थ म्हणविले. अशा देवार्ने सुंदरमठांत वास करून आपला दास संनिध ठेवला व सगळा प्रांतच पावन केला. या सुंदरमठाचे सौंदर्य बावी, पोखरणी, झरे इत्यादिकांनी विशेषच वाढत आहे. ज्या कड्याकपाटांत जातांना भय वाटावे अशा स्थळी. रघुनाथाचे वैभव दृष्टीस पडते. संनिध तर प्रतापगडची रामवरदायिनी माता आहे, असे रामदासांनी म्हटले आहे. क्रमांक ११२ मध्ये अफझुलखानामुळे . मानेना म्हणून पश्चिमेकडे जगन्माता कशी गेली, रामास वरदायिनी रामदासासहीं कशी वरदायिनी झाली, सदानंदामध्ये तिचा "उदो उदो" कसा झाला, अशा रीतीने प्रतापगडच्या भवानीचे वर्णन करून आपला राजा तूंच वाढीव अशी