पान:रामदासवचनामृत.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना (73). यांत रामदासांनी चांगदेव व ज्ञानदेव यांच्याबद्दलचे जे चमत्कार जगांत प्रचलित आहेत त्यांचा उल्लेख केला असावा असे दिसते. काही दुसन्यांच्या जीवींचें जाणतात, व कांहीं वांझेचे वांझपण फेडतात; व काही तर वाळलेल्या काष्ठास पल्लवित करितात ( ४६ ). यांत रामदासांनी प्रत्यक्ष दा. १६.१ यांत वाल्मिक ऋषसिंबंधी “ शुष्ककाष्ठी अंकुर फटले । तपोवळे जयाच्या" अशा प्रकारचे जे उद्गार काढिले आहेत त्यांचाच उल्लेख आहे. कांहीं गुरु गर्भिणीस कन्या अगर पुत्र होईल हे सांगतात, काही पूर्वेचे पश्चिमेस अकस्मात् जातात; जळावर आसन घालून कांही परतीरास बसून जातात; कांहीं गोसावी तर वाघच बनतात; एका गोसाव्यास वाळवंटांत पुरले असताही तो जिवंत राहतो; व काही गोसावी तर मद्यमांसाची फुले बनवितात (६१). या , ओवीत मोरया गोसावी यांनी जो चमत्कार केला अशी दंतकथा आहे तिचा उल्लेख असावा असे दिसते. असो. असे नानाप्रकारचे चमत्कार करणारे गुरु आहेत. पण तोच गुरु खरा की ज्यास अध्यात्मविद्या कळली (६८), व जो आत्मज्ञानपारंगत झाला (६९). - २१. रामदास इतके बुद्धिवादी होते तथापि त्यांच्या अंतःकरणांत करुणेचा पाझर होता. त्यांचे अंतःकरण वजापेक्षां कठीण, पण कुसमापक्षाही मृदु होते, हे त्यांच्या असंख्य करुणाष्टकांवरून सिद्ध होत आहे. येथे सर्व करुणाष्टके घेण्यास जागा नाही, म्हणून काही महत्त्वाचीच करुणाष्टके तेवढी उध्दत केली आहेत. सदासर्वदा देवाचा योग घडावा व त्याचे कारणी आपला देह पडावा (क.९७) असें रामदासांनी म्हटले आहे. साधुजनांच्या संगतीने समाधान वाटते; पण त्यांचा वियोग झाला असता दुःख होऊन काळ कंठेनासा होतो ( क्र. ९८); लोकांमध्ये रामाचा दास या नांवाने मला पाचारितात, पण अंतरांत त्याच्या भक्तीचा लेशही नाही (क्र. ९९ ) ! संसाराकडे व प्रपंचाकडे माझें मन अयाप ओढ घेते ( क्र. १०० ); पळपळ आयुष्य जात असतां व काळ लळलळ विष ओकीत असतां रामावांचन या जगांत सौख्यच नाही (क्र. १०१ ); मनासारिखी सुंदर भार्या, कन्या, जावई, मुले, धनधान्य, अलंकार, बसनें, आरो• ‘ग्य, शांततायुक्त ग्राम, साधूंची संगति, व देवाची प्राप्ति होणे, हा फार सुरुताचा योग आहे असें रामदासांनी म्हटले आहे ( क. १०२). माझ्या अंतरींचा निश्चय घडिघडि बिघडत असल्याने मजवर करुणेचा तूं पूर लोट (क्र.१०३); माझ्या हातून कोणतेही कार्य झाले नसून मी फक्त भूमिभार झालो आहे (क.