पान:रामदासवचनामृत.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० रामदासवचनामृत मुळाकडे पाहू लागल्यास तिला रामच दिसतो; मन मुरडले असता त्यास रामच भेटतो; वदन चुकवू गेले असतां सन्मुख रामच दिसतो; एकदां सन्मुख झाल्यावर केव्हाही राम विन्मुख होत नाही; विसरून पाहिले असतां सुद्धा रामाचेंच दर्शन होते; अशी खूण सर्वत्रांस सांगून रामदास या जगांतून पार झाले असें म्हटले आहे ( क्र. ९१). "मानपंचक" या प्रकरणांतूनही दोनच उतारे घेतले आहेत. पहिल्यांत रामराज्याचे वर्णन आहे. रामराज्य त्यासच म्हणावें की, ज्यांत बहुवृष्टि अनावृष्टि नाहीत; चिंता व व्याधि यांचा लेशही नाही; युद्ध व दारिद्र्य नाहींच नाहीत; सर्वत्र सत्याचे साम्राज्य आहे; भूमि अद्भुत पिकतात, व वृक्ष सदा फळे देतात; श्वापद, पक्षी वगैरे जीव नेहमी आनंदरूप विचरतात; च कीर्तन व नामघोष यांच्या गर्जनेने सर्व पृथ्वी दुमदुमून जाते ( क्र. ९२ ). दुसन्या उता-यांत रामाचें ध्यान करणे, अगर शिवाचे ध्यान करणे, अगर शक्तीचें ध्यान करणे, अगर इतर कोणत्याही देवतेचे ध्यान करणे, हे सर्व सारखेच होय असें रामदासांनी सांगितले आहे. मानवांचे सेवक नानापरीने कष्टतात; मी देवांचा देव सेविल्याने धन्य झालो असे रामदासांनी येथे उदार काढले आहेत ( क्र. ९३ ). “निर्गुण ध्यान" या प्रकरणांतून एकच उतारा घेतला आहे. मुमुक्षु, साधक, सिद्ध, योगी, वीतरागी, जोगी, जंगम, फकीर, ऋषि, मुनि, अवतार, सर्व याच मार्गाने स्वरूपस्थितप्रित गेले आहेत असें रामदासांनी म्हटले आहे (क्र. ९.). .. २०. रामदासांच्या समग्रग्रंथांत "जनस्वभावगोसावी" या नांवाचे एक मकरण आहे. त्याकडे लोकांचे जितकें लक्ष जावें तितकें गेलेले नाही असे दिसते. या केवळ सत्तर ओंव्यांच्या प्रकरणांत त्यांनी भोंदू गुरूंचे वर्णन अशा बहारीने केलें आहे की ते जर या गुरूंनी मनांत बाळगले तर त्यांस भोंदूपणा करण्याच्या नवीन क्लप्त्याच सुचावयाच्या नाहीत. मुख्य, अनुभवावांचन बोलणारे हे सर्व भोंदू गुरूच होत असें रामदासांचे मत आहे. काही गुरु विष्ठेचा अंगिकार करून अगर ओंगळपणाच्या सबबीने गुरु बनतात; कांहीं भूतांस व वेताळांस चेतवं शकतात, नानाप्रकारची चेटके करून, स्मशानांत राहून, जिकडे तिकडे सर्पच सर्प करून, नपुंसकास वनिता भोगण्याचे सामर्थ्य देऊन, सर्व धातूंचे सोनेरुपै. बनवून कांही गरूपणाप्रत पावतात; कांही गुरु आज गुप्त होऊन उद्या उमटतात; कांहीं व्याघ्रावर बसून हातांत साचा चाबूक घेऊन धांवतात (37), आणि कांही तर अचेतनेच चालवितात (३३), अगर रेड्याकडून वेद बोलवितात