पान:रामदासवचनामृत.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना करावयाचे आहेत. क्रमांक ५ यांत “ देह पडो का देव जोडो" अशा भावनेने देवाच्या पाठीशी लागल्यावांचन देवाचे दर्शन व्हावयाचे नाही असें रामदासांनी लिहिले आहे ( क्र. ८५). क्रमांक ८६ यांत ज्यास परमार्थ करावयाचा आहे. . त्याने प्रपंचाची मिठी सोडविली पाहिजे असे स्पष्ट सांगितले आहे. दासबोधांत याच्या उलट " प्रपंचपरमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी" असें जें रामदासांनी सांगितले आहे ते ध्यानात ठेविले पाहिजे. क्रमांक ८७ मध्ये कोणास कळू न देतां अंतरीच रामाचा अखंड जप चालल्यावर जो साक्षात्कार होतो तो आपल्यास लोकांनी मोठे म्हणावें या बुद्धीने लोकांस सांगितला असता तो पुनः होणार नाही असा रामदास आपल्या जीवींचा अनुभव सांगतात. क्रमांक ८८ मध्ये रामास मागणे असेल तर आपण राम व्हावे, व रामानें आपलें दास्य करावें, इतकेंच त्यास मागावें असें सांगितले आहे. १८. मनाचे श्लोक सर्व उद्भत करण्यास येथे जागा नाही. तथापि त्यांतील काही निवडक श्लोक या पुस्तकांत घेतल्यावांचन गत्यंतरच नव्हते. भक्तिपंथ हाच सगळ्यांत सोपा पंथ, प्रभाती रामाचे चिंतन करावें, ज्यामुळे आपली कीर्त मागें उरेल अशा प्रकारची क्रिया येथे करावी; समर्थाच्या सेवकास वक्र पाहण्यास काळही समर्थ होणार नाही; देव अल्पमात्र आपले धारिष्ट पहात असतो; संकटांत स्वामी एकदम उडी घालतो; देवकार्यांत देह झिजविण्याची वासना आपण बळकट ठेवावी; राम हा कल्पतरु असल्याने त्याच्या खाली मागितलेली फळे येतात; जातां, येतां, जेवितां, सखी होतां, नामस्मरण करावें, देव हा श्वेतही नाही व पीतही नाही, हाती घेऊं गेलें असतां तो सांपडत नाही, विधीस निर्माण करणारा, विष्णूचे प्रतिपालन करणारा, व शंकरास शेवटी जाळणारा तोच मुख्य देव होय; असा जो मोठा देव तो या जगांत चोरला असल्याने गुरूवांचन तो दिसत नाहीं; व या देवाचे स्वरूप नभासारखें विस्तीर्ण, व्यापक, अलिप्त, व निर्विकार आहे, अशा प्रकारच्या कल्पना ज्या मनाच्या श्लोकांत रामदासांनी सांगितल्या आहेत त्या सर्वांच्या माहितीच्याच आहेत. १९. प्रस्तुत पुस्तकांत समर्थांच्या "पंचसमासी" पैकी दोनच उतारे .घतले आहेत. पहिल्यांत मन पांगळून बुद्धि ज्यावेळी स्वरूपांत लीन होते, अनुभव अनुभवामध्ये मुरून जातो, व निष्कलंक निर्मळ आत्मा प्रकाशमान होतो त्या स्थितीसच स्वरूपानुसंधान म्हणावे असें रामदासांनी म्हटले आहे (क. ९०), दुसऱ्यांत सर्वत्र रामदर्शन कसे होते हे रामदासांनी सांगितले आहे. वृत्ति