पान:रामदासवचनामृत.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

“१८ रामदासवचनामृत N । हेच मोठ्या चातुर्याचे लक्षण होय ( क्र. ७७ ). आपण करून करवावें; आपण विवरून विवरवावें; आपण भजनमागास धरून लोकांकडूनही : धरवावें. जो करून बोलेल त्याचेच शब्द जगांत प्रमाण मानितात ( क्र. ७८ ); नष्ट लोकांशी गांठ पडली असतां नष्टांकडूनच त्यांचा पराभव करवावा; हुंब्यास हुंबा लावून द्यावा; खटनटाची फजिती खटनटाकडूनच करवावी. ज्याला समुदाय मोठा व्हावा अशी इच्छा असेल त्याच्या तनावा बळकट असाव्या लागतात. जो दुसन्यांवर विसंबून राहतो त्याचा कार्यभाग बुडतो. जो आपणच कष्टत जातो त्यासच स्वीकृत कार्यात यश येते ( क्र. ७९ ). " कांहीं गल्बला कांहीं निवळ" अशा संमिश्रणाने आपला काल घालवीत जावा ( क्र. ८०). लोक आपली मार्गप्रतीक्षा करीत असतां वेळेस तत्काळ अशा साधने पुढे उभे रहावे. वडिलांचे मन जसें सर्व मुलांवर असते त्याप्रमाणे अशा महापुरुषाने सर्वत्रांची चिंता करीत जावी (क्र. ८१ ). आपण जेथे तेथे नित्य नवा असून लोकांस हा असावा असें नेहमी वाटत असावें. काही तरी एक उत्कट कार्य केल्याखेरजि कीर्ति होत नाही हे मनांत बाळगावें. जेथें अखंड तजविजा चाळणा होतात तेथें कार्य करण्याचे निरनिराळे मार्ग सुचतात. यामुळे एकांतांत जाऊन विवेक करावा, व आत्मारामाचे दर्शन घ्यावे ( क्र. ८२). जो एक क्षणही वायां जाऊं देणार नाही त्यासच तीक्ष्णबुद्धीचा म्हणावें. ज्याच्या तोंडांतून अखंड वाक्प्रवाह सुरू असतो त्यासच लोकांची अंतःकरणे आपल्या ताब्यात घेतां येतात. जेथें तेथे लोकांस भजनास लावून आपण तेथून निसटावें. उदासवृत्तीच्या बळाने आल्यागेल्याची क्षिती नाही असे झाले पाहिजे. आपण जेथे कोणीच पाहणार नाही अशा खनाळामध्ये जाऊन ईश्वराचे ध्यान करून सर्वत्रांची चिंता वाहिली असता त्यांची मनें सहजच आपल्याकडे आकृष्ट होतील. अशा मनुण्यानेच जन्मास येऊन सार्थक केलें असें रामदासांनी लिहिले आहे ( क. ८३). ___संकीणग्रंथविवरण. १७. रामदासांचा " जुना दासबोध " या नांवाचा जो ग्रंथ आहे तो आपल्या दासबोधाचें मूळ होय असे आपण वर पाहिलेच आहे. त्यांतील व . - यांतील शिकवण यांत फारच साम्य आहे हे त्यांचा अभ्यास करणाऱ्यांस सहज दिसून येईल. येथे आपणांस जुन्या दासबोधापैकी दोनचारच नवे मुद्दे उद्धृत