पान:रामदासवचनामृत.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना १७. मध्येच पाहणे ऐकणे, वगैरे क्रिया घडतात, जे अत्यंत निकट पदार्थाच्याही अलीकडचे आहे, जे वाचू लागले असतां अक्षरांमध्येच दिसते, जे कोणतीही वस्तु घेण्याच्या अगोदर हातांत येते, जे चर्मदृष्टीचे देखणे नसून ज्ञानदृष्टीचे देखणे आहे, तेंच परब्रह्म होय ( क. ७१ ), जें धरूं जातां धरवत नाही, जें टाकू जातां टाकवत नाही, जे सर्वांचे मस्तकी सूर्याप्रमाणे प्रकाशतें, ज्यास पहावयास ती क्षेत्रांस जावे लागत नाही, जे बेसलेठायींच सबाह्यांतरी व्यापून दिसते, जे वामसव्य, अधऊर्च, सन्मुखविन्मुख सर्वत्र एकदम असते, ज्याच्या असंभाव्य विस्ताराची कल्पनाही कोणास होणार नाही, अशा त्या विमळ ब्रह्माची सरी कोणास द्यावी ( क्र. ७२ ) ? अशा रीतीने रामदासांनी. ब्रह्माच्या सर्वगत अस्तित्वाचे मोठ्या बहारीने वर्णन केले आहे. १६. रामदासांसारखे कर्मयोगी रामदासच होत. परमार्थाचा अनुभव . घेऊन जगांत योग्य रीतीने वर्तणूक करण्याचे भाग्य थोड्या साधूसच लाभते. अशा साधूंत रामदासांची प्रामुख्याने गणना होते असे म्हणण्यास हरकत नाही. विशेषेकरून त्यांच्या दासबोधग्रंथांत पारमार्थिक कर्मयोग्याची वर्तणूक कशी असावी याबद्दल त्यांनी जे विचार प्रकट केले आहेत ते आपल्या स्वतःच्याच अनुभवावरून केले आहेत; तथापि त्यांपासून इतरांनीही पुष्कळ बोध घेण्यासाखा आहे. साधूने कीर्तिरूपानें उदंड विख्यात असावे, परंतु पाहूं गेलें असतां त्याने एकाएकी सांपडूं नये, असें रामदासांनी लिहिले आहे. ज्या स्थळास जावयाचें तें सांगं नये, व जे ठिकाण सांगावे त्या ठिकाणी जाऊं नये; अशा प्रकारे आपली स्थितिगति लोकांच्या निदर्शनास आणू नये, असें रामदासांनी म्हटले आहे. . लोकांस जे पहावेसे वाटते ते याने पाहूं नये. याने उदंड समुदाय करावे; पण गप्तरूपाने करावे. लोकांचे निरनिराळे अधिकार शोधून त्यांस जवळ अगर दूर . ठेवावें; पण आपला मगज कांहीतरी बाळगून रहावें. महंतानें महंत करून त्यांस नाना देशी विखुरावें (क्र. ७३ ). आपण मनापासून भक्ति केल्यास अशा महापुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणन लोक त्यांस धुंडीत येतील. शिष्यास कोणतीही गोष्ट न मागण्याची त्याने प्रतिज्ञा करावी. फक्त आपणांमागें जगदीशास भजत जावे इतकेंच मागावें (क. ७४.). ज्याप्रमाणे आत्मा ठायींच्या ठायीं गुप्त होतो त्याप्रमाणे साधूने तेथल्या तेथेंच नाहीसे होऊन सर्व लोकांस गुप्तरीतीने वर्तवीत असावें (क्र. ७५ ). मुख्य लोकांचे मनोगत राखणे - THS