पान:रामदासवचनामृत.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- १३५] स्फुट प्रकरण... १३५. श्रीसमर्थकृत पांगळ. भरत गा खंडामाजी । शरयूतीर बा गांव । धर्माचें नगर तेथें। राज्य करी रामराव । पांगुळां पाय देतो। देव जानकीचा नाथ । जाईन मी तया ठायां । देवा उत्तम तो ठाव ॥१॥ राघवाचा धर्म जागो । (सर्व) अधर्म भागो। अज्ञान निरसोनियां । विज्ञानी लक्ष लागो ॥ध्रु०॥ मीपणाचे मोडले पाय । ह्मणउनि पांगूळ जालों। तूंपणाची कीर्ति देई । ऐकोनियां शरण आलों। मीतूंपण निरसी माझें । भजनभिंतीवरि बैसलों। प्रेमफडकें पसरोनियां । कृपादान मागों आलों ॥२॥ जनीं येक तूंचि दाता । म्हणुनि आलों मागावया । मागणे निरसें जेणें । ऐसें दे गा रामराया। नवविधा दुभतें देई । भावहलगा बैलावया ॥ . ज्ञानकाठी देई करीं। वैराग्यवोल पांघराया ॥३॥ दासीहाती देवविसी। तें मी नेधे सर्वथा। द्वैतदान ने जाण । दोन वेळे. आणीतां। अपूर्णता देऊं नको । पूर्ण करी निकामता। आपणा ऐसें दान तेई । तूं तरी इच्छेचा दाता ॥४॥ तुझे कृपेचा कांबळा देई । मज पांगुळाकारणें । माया मोहो हींव वातें । तें हें निवारें जेणें । निस्काम भाकर देई । कामक्षुधा हरे जेणें। बोधाचें ताक पाजीं। शब्द खुंटे धालेपणे ॥ ५॥ - ।