पान:रामदासवचनामृत.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदावसचनामृत १५. सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर साधनाची जरूरी राहते किंवा नाही याबद्दल रामदासांनी दोन निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी मते प्रतिपादली आहेत. एकदा त्यांनी असे म्हटले आहे की साधन हा देहाचा धर्म असल्याने देह असेपर्यंत साधन हे केलेच पाहिजे. सिद्ध झाल्यावर हा अद्यापिही साधन करतो अर्से लोक म्हणतील या लज्जेने साधन टाकून देणे हे शहाणपणाचे काम नव्हे (क. ६३). याच्या उलट दुसरे एके ठिकाणी त्यांनी असे म्हटले आहे की, साधनाने साध्य प्राप्त झाल्यावर साधनाची खटपट करणे म्हणजे कुंभार राजा झाल्यावर पुनः त्याने आपली मडकी घडणे,अगर रंक राजा झाल्यावर रंकपणाचा गलबला त्याने पुनः चालविणे, तीथीने तीर्थास जाणे, अगर उन्मन्यवस्थेने मनास आवरणे, याप्रमाणेच चमत्कारिक आहे (क्र. ६४). मुख्य साक्षात्काराचे लक्षण म्हटले म्हणजे पापाची खंडणा झाली व जन्मयातना चुकली असा अनुभव आला पाहिजे, देवभक्तांतील विभक्तता निघून गेली पाहिजे, ब्रह्मांडाच्या कर्त्यास ओळखून मुख्य कर्तृत्वाचे स्वरूप कळले पाहिजे; येथे अनुमान राहिल्यास केलेला परमार्थ वायां गेला असें रामदासांनी म्हटले आहे ( क्र. ६५ ). योग्यांच्या अनुभवदृष्टीपुढे जे उदंड धन आहे त्याची किंमत लोकांस कशी कळावी ? जो काष्ठस्वार्थ करतो, अगर शुभा एकवटतो, त्यास श्रेष्ठरत्नांची किंमत कशी कळणार ? हे गुप्तधन सांपडण्याकरितां सद्रूच्या उपदेशाचें अंजन लेइले पाहिजे ( क्र. ६६). ज्यास भेटूं जातां तुटी पडते, व ज्याची न भेटतां भेट होते, जे पाहूं जातां दिसत नाही, व न पाहतांही जें सर्वत्र दिसते, तेच स्वरूप असे समजावे (क्र. ६७ ). ज्यास तस्कराचे भय नाही, ज्यास राजभय, अमिभय अगर श्वापदभय मुळीच नाहीत, जे अधिक व न्यून होत नाही, जे मिळविण्याकरितां योगियांच्या अनुज्ञेप्रमाणे आकाशमार्गीच्या गुप्तपंथाने चालावे लागते, ज्याची प्राप्ति झाली असतां राजाचे सामर्थ्य अंगी बाणते, व ज्याच्यावांचून राजेही भिकारीसे दिसतात, तोच केवळ परमार्थ होय ( क.६९). ज्यास शस्त्राने तोडिलें असतां तुटत नाही, जे अग्नीवर असून जळत नाही, जे सर्वत्र सूक्ष्म रीतीने भरलेले आहे ( क्र. ७० ), जे अनंत ब्रह्मांडाखालतें व अनंत ब्रह्मांडावरुते आहे, जळाने जसें जळचरांस • व्यापावें तसें में सर्व सृष्टीस व्यापून आहे, जे वनास भेदिले असून ज्याचा मृदुपणा गेला नाही, जे कधीही विन्मुख न होतां अखंड सन्मुख असते, ज्या