पान:रामदासवचनामृत.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत- संकीर्ण ग्रंथ. [६११२ रामवरदायिनी माता। दासे धुंडुन काढिली। बोळखी पडिता ठाई । भिन्न भेड़ असचिना ॥ उदो उदो तुझा उदो । जाहला सचराचरौं । गोंधळ घातला देवीं । ब्रह्माविष्णुमहेश्वरी ॥ मातेसी काय चोरावें । सर्वही ठाउके तिला । उत्तीर्ण व्हावया नाहीं । तेची ते सचराचरीं ॥ बोलणे चालणे तीचें। देखणे चाखणे सदा।। आखंड खेळते आंगीं। प्राणीमात्रांचिये पाहा ॥ -रामदासांची कविता ४३६.२२-५७. १३३. देव व देउळे. . देहेदेवाळयामधे । पाहाणे देव तो बरा । देव सांडुनी देवाल्ये । वर्णिती सर्वही कवी ॥ दिसेना लोचनाला रे। घाला रे मन त्यामधे । येकला सर्व देवाली । गुप्त नाना परी वसे ॥ आनंत कोटि देवाल्यें । त्यामध्ये येकला प्रभु। दीपानें दिसेना नाहीं । त्याने त्यासचि पाहाणे ॥ उजेडे दिसेना नाहीं। आंधारें गुप्त होय ना। कदा हातासी लागेना । सर्वथा पूजीतां नये ॥ पूजीतां सर्व देवाल्यें । तेणें तो तृप्त होतसे। प्रतक्ष वर्ततें आतां । पाहा रे विवेकी तुम्हीं॥ देवाल्ये वर्णिती ज्ञाते । ते ज्ञाते नव्हती कदा । देव वर्णील तो ज्ञाता । ज्ञाने मोक्षची पावतो॥