पान:रामदासवचनामृत.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१३ 1 .. F१३२] स्फुट प्रकरणे. १७ स्फुट प्रकरणं. --.:-- १३२. शक्ति व युक्ति. प्रतापगिरिचे ठाई । आदिशक्ती विराजते। कामना पुरती तेथें । प्रचीती रोकड्या जनीं॥ शक्तीने पावती सुखें । शक्ती नसतां विटंबणा। शक्तीने नेटका प्राणी । वैभवें भोगितां दिसे ॥ कोण पुसे अशक्ताला । रोगीसें बरॉडी दिसे। कळा नाहीं कांती नाहीं । युक्ती बुद्धी दुरावली ॥ साजिरी शक्ती तो काया। काया मायाची वाढवी। शक्ती तो सर्वही सुखें । शक्ती आनंद भोगवी ॥ शक्तीने मिळती राज्ये । युक्तीने येत्न होतसे। शक्ती युक्ती जये ठाई । तेथें श्रीमंत धांवती॥ युक्तीने चालती सेना । युक्तीने युक्ती वाढवी। संकटी आपणां रक्षी । रक्षी सेना परोपरी॥ फित्व्याने बुडती राज्यें। खबर्दारी असेचिना। युक्ती ना शक्ती ना बेगी। लोक राजी असेचिना ॥ असो हे बोलणे जालें । युक्तीविण कामा नये। युक्तीला पाहिजे शक्ती । तस्मात् शक्ती प्रमाण हे ॥ मुक्त केल्या देवकोडी । सर्वहि शक्तीच्या बळें। समर्थ भवानी माता । समर्था वरु दीधला ॥ १ दुकाळलेला. २ फितुरी. ३ त्वरित, वेगानें,